MTNL Prepaid Plan | अवघ्या 47 रुपयात 90 दिवसापर्यंत चालू राहील सिम, सोबत मिळतील 500 SMS, पहात राहीले Jio-Airtel-Vi!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MTNL Prepaid Plan | बाजारातील सर्व टेलिकॉम कंपन्या सर्व यूजर्सना एकापेक्षा एक प्लान देत असतात. या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ वैधताच नाही तर डेटा आणि कॉलिंगसह अनेक फायदेही मिळतात. एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी, कंपन्यांनी अनेक प्लान दिले आहेत जे कमी खर्चात अधिक फायदे देतात. Airtel, Jio, Vodafone Idea यूजर्सना अनेक प्रकारचे प्लान दिले जात आहेत. (MTNL Prepaid Plan)

 

हे झाले खाजगी कंपन्यांबाबत, ज्यांचा वापर अनेक यूजर्स करतात. आता सरकारी कंपन्यांबद्दल बोलूया. बाजारात बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी टेलिकॉम कंपन्या आहेत. खाजगी कंपन्यांप्रमाणे या कंपन्याही अनेक उत्तम योजना देतात. आज आम्ही तुम्हाला MTNL च्या एका प्लानबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत 47 रुपये आहे. (MTNL Prepaid Plan)

 

किंमत नक्कीच कमी आहे पण त्याची वैधता 90 दिवस आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. या प्लानचे फायदे जाणून घेऊया.

 

एमटीएनएल रु. 47 प्लान डिटेल्स :
या प्लॅनमध्ये, यूजर्सना 90 दिवसांची वैधता दिली जात आहे. जर तुम्हाला सिम चालू ठेवण्यासाठी प्लान हवा असेल तर हा प्लान तुमच्यासाठी योग्य असेल. या प्लानमध्ये यूजर्सना सिम एक्स्टेंशनसह 500 मोफत एसएमएस सुविधा दिली जात आहे. यामध्ये युजर्सना कॉलिंग किंवा डेटा सुविधा दिली जात नाही.

 

कोणत्याही कंपनीकडे नाही असा प्लान :
जर आपण इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीबद्दल बोललो, तर सध्या मार्केटमध्ये असा कोणताही प्लान उपलब्ध नाही. Reliance Jio, Airtel, Vodafone Idea, BSNL सध्या असा कोणताही प्लॅन देत नाहीत,
पण कदाचित MTNL चा हा प्लान बघून ते काहीतरी नवीन देतील.

Web Title :- MTNL Prepaid Plan | gadgets news mtnl prepaid plan rs 47 with 90 days validity to compete with jio-airtel-vi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | फक्त 12 दिवस आणखी ! सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढतील 27000 रुपये, मोदी सरकार करणार घोषणा

 

Shivsena | चालते व्हा, शिवसेनेकडून कारवाई सुरुच, शिंदे गटात सामील खासदारांची पदावरून हकालपट्टी

 

Chandrakant Patil | ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं’, चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्याची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल