ब्लॅक फंगसपासून बचाव आणि व्यवस्थापनासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसला हरवणारे लोक ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसला वेगाने बळी पडत आहेत. मागील काही दिवसात देशाच्या विविध भागात हे रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटरवर लोकांना त्याच्या संसर्गापासून वाचण्यासाठी आणि व्यवस्थापनाबाबत सल्ला दिला आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी चार स्लाईडसह एक ट्विट करत म्हटले की, सामान्यपणे म्युकोर्मिकोसिस ज्यास ब्लॅक फंगस म्हटले जाते, अलिकडे अनेक कोविड रूग्णांमध्ये आढळला आहे. जागृतता आणि तातडीने केलेले निदान फंगस इन्फेक्शनला पसरण्यापासून रोखण्यात मदत करू शकते. पहिल्या स्लाईडमध्ये म्युकरमायकोसिसची माहिती देताना त्यांनी म्हटले, हे एक एक फंगल इन्फेक्शन आहे आणि प्रामुख्याने हे मेडिकल हेल्थ समस्या असणार्‍या लोकांना प्रभावित करते. ज्यांच्यात पर्यावरणात असलेल्या संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी असते.

तर, दुसर्‍या स्लाईडमध्ये त्यांनी एखादा रूग्ण कसा संक्रमित होतो ते सांगितले. यामध्ये, कोमोरबिडिटीज, व्हेरिकोनाजोल थेरेपी, अनियंत्रित डायबिटीज मेलिटस, स्टेरॉईड इम्युनिटी वाढवणे किंवा मोठ्या काळापर्यंत आयसीयूमध्ये राहणार्‍या लोकांना फंगल संसर्ग होण्याचा धोका असतो. सोबतच पुढील दोन स्लाईडमध्ये त्यांनी म्युकरमायकोसिसची संभाव्य लक्षणे, काय करावे आणि काय करूनये याची यादी दिली आहे.

देशातील कर्नाटक, ओडिसा, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये ब्लॅक फंगसची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तर, मध्य प्रदेशमध्ये ब्लॅक फंगसने पीडित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

या आजाराने पीडित रूग्णाचे नाक कोरडे पडत असल्याने त्यामधून रक्त वाहणे आणि डोकेदुखी सामान्य लक्षण आहे. तसेच, नरम पेशी आणि हाडांमध्ये घुसल्याने या इन्फेक्शनमुळे त्वचेवर काळे डाग पडू लागतात. सोबतच डोळ्यांमध्ये वेदना आणि सूज, पापण्या फुटणे आणि अस्पष्ट दिसणे सुद्धा ब्लॅक फंगसचे संकेत आहेत. गंभीर झाल्यास रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याचे डोळे काढणे आवश्यक ठरते. अशा स्थितीत पोहचल्यास रूग्णाची दिसण्याची क्षमता वाचवता येऊ शकत नाही.