Mucormycosis : कोरोना रूग्णांना होतोय आणखी एक जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत आणखी एक चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. कोरोनामुळे लोक म्युकोरमायकोसिसला बळी पडत आहेत. गुजरात आणि दिल्लीत अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे कोरोनातून रिकव्हरीनंतर लोक म्युकोरमायकोसिस सारख्या धोकादायक आजाराला बळी पडत आहेत.

म्युकोरमायकोसिस इन्फेक्शन

सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनीष मुंजाल यांनी सांगितले, आम्ही कोविड-19 मुळे होणार्‍या धोकादायक फंगल इन्फेक्शनची अनेक प्रकरणे दिसून येतात. मागील दोन दिवसात म्युकोरमायकोसिसची 6 प्रकरणे समोर आली आहेत. मागच्या वर्षीसुद्धा यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, अनेक लोकांच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती आणि काही लोकांच्या नाक आणि जबड्याची हाडे काढावी लागली होती.

म्युकोरमायकोसिस काय आहे –

म्युकोरमायकोसिस एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे जे शरीरात खुप वेगाने पसरते. यास ब्लॅक फंगस सुद्धा म्हटले जाते. म्युकोरमायकोसिस इन्फेक्शन मेंदू, फुफ्फुसे किंवा त्वचेवर सुद्धा होऊ शकते. या आजाराने अनेक लोकांची दृष्टी जाते तर काही रूग्णांचा जबडा आणि नाकाचे हाड खराब होते. जर वेळी यास नियंत्रणात आणले नाही तर रूग्णांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

म्युकोरमायकोसिसची लक्षणे –

1  चेहर्‍यावर एका बाजूला सूज

2  डोकेदुखी

3  सायनसची समस्या

4  नाकाच्या वरच्या भागात काळ्या जखमा होतो आणि जास्त ताप

5  फुफ्फुसातील म्युकोरमायकोसिसमुळे खोकला

6  छातीत वेदना

7  श्वास घेण्यास त्रास

8  त्वचेवर इन्फेक्शन झाल्यास बुरशी किंवा फोड येतात, येथील त्वचा काळी पडते

9  डोळ्यात वेदना, अस्पष्ट दिसणे

10  पोटदुखी, उलटी किंवा मळमळ

म्युकोरमायकोसिस आजार सामान्यपणे त्या लोकांना होतो ज्यांची इम्युनिटी खुप कमी असते. कोरोनाच्या दरम्यान किंवा बरे झाल्यानंतर इम्यून सिस्टम खुप कमजोर असते. कोरोनाच्या ज्या रूग्णांना डायबिटीज आहे, शुगर लेव्हल वाढल्यास त्यांच्यात म्युकोरमायकोसिस धोकादायक रूप घेऊ शकतो.