Rajesh Tope : म्युकरमायकोसिसवरील ‘Amphotericin B’ या औषधासाठी राज्य सरकार केंद्रापुढे हतबल

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात एक कोरोनाचं संकट असतानाच दुसरं एक संकट समोर आलं आहे ते म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस. या आजाराचेही अनेक रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. ब्लॅक फंगस रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. यामध्येच आता केंद्र सरकारपुढे आपण हतबल असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस रुग्णांवर शंभर टक्के मोफत उपचार व्हावेत यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत याचा समावेश केला आहे. मोफत औषध देण्यात येतील. एम्फोटेरेसिन बी (Amphotericin b) या नावाचे महाग असलेले औषध देखील मोफत देण्यात येईल. ब्लॅक फंगस रुग्णांना आर्थिक भूर्दंड पडू नये याची काळजी घेण्यात येते. Amphotericin b हे लिम्फोसोब फॉर्म याचा म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी उपयोग होतो. तसेच त्याचा पुरवठा अतिशय कमी आहे. म्हणून मी केंद्रात या फॉर्मसाठी आवश्यक पुरवठ्याची मागणी केलीय असे राजेश टोपे म्हणाले.

पुढे राजेश टोपे म्हणाले, आम्ही उत्पादक कंपन्यांना ऑर्डर्स दिल्या आहेत. परंतु, ते आम्हाला देऊ शकत नाही. कारण, वितरणाचे सर्व अधिकार हे केंद्राने आपल्याकडे घेतले आहेत. त्यांना जोवर वरून आदेश येत नाही तोवर ते पुरवठा करू शकणार नाहीत, म्हणून Amphotericin b या औषधाच्या पुरवठ्यासंदर्भात पूर्ण हतबलता निर्माण झालीय. मी एवढेच विनंती करेल Amphotericin महाराष्ट्राला वितरण करून द्या. असे ते म्हणाले आहेत.