ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! म्युकोरमायकोसिसच्या रूग्णांचा उपचार आता महाराष्ट्रात मोफत होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनातून ठिक झालेल्या लोकांना एक नवीन आजार होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचे नाव म्युकोरमायकोसिस आहे. सूरतमध्ये दोन दिवसांपूर्वी म्युकोरमायकोसिसचे 40 रूग्ण अचानक समोर आले होते आणि त्यांच्यापैकी 8 रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले होते. हा आजार झालेले काही रूग्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा समोर आले आहेत. सोमवारीच चंद्रपुरमधून म्युकोरमायकोसिसचा संसर्ग 10 रूग्णांना झाल्याचे वृत्त आले आहे, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुमारे 30 पेक्षा जास्त म्युकोरमायकोसिसने पीडित रूग्णांवर मुंबईच्या केईएम आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

म्युकोरमायकोसिसचा उपचार आता मोफत होणार
या जीवघेण्या आजाराचे गांभीर्य जाणून घेत राज्य सरकारने म्युकोरमायकोसिस आजाराचा महात्मा फुले जन-आरोग्य योजनेत समावेश केला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाने कोरोना रूग्ण आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकोरमायकोसिस झालेल्या रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या आजाराचा समावेश आता महात्मा फुले जन-आरोग्य योजनेत झाल्याने आता रूग्णांना या मध्यमातून आर्थिक मदत मिळू शकते आणि या आजाराचा उपचार मोफत होऊ शकतो. म्युकोरमायकोसिसचा उपचार खुप महाग असतो, ज्याचा खर्च उचलणे सामान्य रुग्णांना अवघड जाते. यासाठी ठाकरे सरकारचा हा निर्णय गरीब रूग्णांसाठी मोठा दिलासादायक आहे.