Mucormycosis : ब्लॅक फंगसपेक्षा व्हाईट फंगस जास्त ‘घातक’ ? जाणून घ्या लक्षणं, कारणं आणि उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माणसाला भयभीत करून सोडलं आहे. त्यातच दुसऱ्या एका आजारानं उडी घेतली. ती म्हणजे काळी बुरशी (Black fungus). यामध्येच आता पांढऱ्या बुरशीचा (White fungus) संसर्ग अधिक पसरताना दिसत आहे. दुसरी चिंताजनक बाब म्हणजे पांढऱ्या बुरशीचा (White fungus) आजार काळ्या बुरशी (Black fungus).पेक्षा अधिक जीवघेणा असल्याचे आहे. काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे माणसाच्या शरीरावर अधिक परिणामकारक नुकसान होते. तसेच संसर्गाची तीव्रता अधिक झाल्यास माणसाचे अवयव काढावे लागू शकते अथवा मृत्यूच्या दाढेत सापडू शकतो. तर पांढऱ्या बुरशी (White fungus) आजारासंदर्भात स्किनफिन क्लिनिकमधील तज्ञ डॉ. अभिनव सिंह यांनी Only my health शी बोलताना माहिती दिलीय.

डॉ. अभिनव सिंह म्हटले की, ”पांढऱ्या बुरशीला वैद्यकिय परिभाषेत Candidiasis असे म्हणतात. साधारणपणे सर्वांच्या शरीरात या प्रकारची बुरशी (White fungus) असते. परंतु, ज्यावेळी रोग प्रतिकारशक्ती कमजोर बनते. त्यावेळी या आजाराने माणसे प्रभावित होत असतात. काळ्या बुरशीची तुलना केली असता त्यामध्ये पांढरी बुरशी शरीरात वाढण्याचा वेग अधिक आहे.

पांढऱ्या आणि काळ्या बुरशीबाबत माहिती देताना मेदांता हॉस्पिटलचे चेस्ट सर्जन डॉ. अरविंद कुमार म्हणाले की,पांढरी बुरशी (White fungus) आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करते. पांढर्‍या बुरशीपेक्षा काळी बुरशी जास्त धोकादायक आहे. याचे कारण काळ्या बुरशीचा वेगाने व्यक्तीच्या शरीराच्या अन्य भागावर परिणाम होतो. मात्र, पांढऱ्या बुरशीचा असा गंभीर प्रभाव पडत नाही. यामुळे काळ्या बुरशीचे प्रमाण जास्त घातक आणि धोकादायक असते. म्हणजेच काळ्या बुरशीचा हा एक आक्रमक प्रकार आहे, तसेच तो माणसाला अधिक पटकन जाळ्यात अडकवतो. तसेच, बहुतांश औषधे त्या आजारावर प्रभाव करू शकत नाहीत. त्या आजारावर केवळ Amphotericin हे बुरशीविरोशी औषध काम करते.

त्वचेवर पांढऱ्या बुरशीचा (White fungus) परिणाम –
डॉ. अभिनव सिंह म्हणाले, जर आपण त्वचेसंदर्भात बोलाल तर त्याचा तोंडाच्या भागावर अधिक परिणाम होतो. दरम्यान शरीराचा असा भाग जेथे ओलावा असतो, तिथे अधिक संसर्ग होण्याची शक्यता जास्तच असते.

याचा फुफ्फुसांवर परिणाम ?
पांढरी बुरशी (White fungus) श्वासांद्वारे फुफ्फुसांना संक्रमित करत असते. म्हणून, रुग्णांना निमोनियाच्या जाळ्यात अडकावे लागते. फुफ्फुसामध्ये बुरशीचे गोळे तयार होऊ शकतात. या कारणाने पांढरी बुरशी माणसाच्या फुफ्फुसांमध्ये पसरत असते.

धोकादायक आजार ?
डॉ. अभिनव सिंह माहिती देताना म्हणाले, ‘लोक पांढरी बुरशी (White fungus) जास्त धोकादायक म्हणत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे ते ओळखणं थोडं आहे. अन्य बुरशीजन्य संसर्गांमुळे अधिक ताप येतो, जे ओळखणे सोपे असतं. मात्र, पांढऱ्या बुरशीमध्ये अशी काही गंभीर लक्षणे जाणवतात की, दिसतच नाहीत. यामुळेच त्याचे उपचार थोडं विलंबनाने सुरू होतात. अनेकवेळा उपचार सुरू होईपर्यंत संक्रमण वाढण्याची शक्यता देखील अधिक असते.

पांढऱ्या बुरशीची (White fungus) लक्षणे काय ?

खोकला

ताप

श्वास घ्यायला त्रास होणं

निमोनिया

कारणं काय ?
शरीरावर ओलसरपणा असणे

रोगप्रतिकारकशक्ती (imunity) कमजोर असणे

स्टेरॉईड्सचा जास्त प्रमाणात वापर

मधुमेहाचा आजार असणे

दीर्घकाळ प्रतिजैविकचा वापर

बुरशीची टेस्ट, औषधांचे डोसविषयी –
ब्लड कल्चर चाचणी, कफची फंगल कल्चर चाचणी, त्वचेवरील KOH फंगस असणं या मार्गांनी या बुरशीची चाचणी केली जाते.
पांढऱ्या बुरशीमध्ये रुग्णाला अँटी-फंगस औषधांचे डोस दिले जाते. हा डोस वेळेवर रुग्णांना देणे अधिक महत्वाचे आहे.
अ‍ॅन्टीफंगल डोस वेळेत न दिला तर ते देखील प्राणघातक ठरू शकते.
शरीरात पांढर्‍या बुरशीचे प्रमाण वाढण्यामुळे फूड पाईपवर परिणाम होतो.

कसा कराल बचाव ?
>
शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे.

> अधिक काळ प्रतिजैविकचा वापर करू नका

> स्टेरॉईड्सचे कमीत कमी, आवश्यक असेल तरच सेवन करणे.

> चांगले पौष्टिक जेवण घेऊन नेहमीच मधुमेह नियंत्रणात ठेवणे.

> लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण