अश्लीलतेचा कळस गाठण्याच्या प्रयत्नात होता मुफ्ती, सोशल मीडिया स्टार हरीम शाहनं कानशिलाखाली लगावली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मिडिया स्टार हरिम शाहने विवादास्पद मुफ्ती अब्दुल कवीच्या श्रीमुखात लगावली आहे. याबाबत स्वतः तीनेच सोमवारी एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे हरिमने आरोप केला आहे की, मुफ्ती तिच्यासोबत अश्लील बोलत होता. तर मुफ्ती अब्दुलने आरोप पेटाळून लावले आहेत. दरम्यान मुफ्तीला थोबाडीत मारल्याने हरिमचा पाकिस्तानच्या सोशल मीडियावर टॉप टेनमध्ये समावेश झाला. बऱ्याच लोकांनी हरिमचे समर्थन केले तर काही लोकांनी टिकटॉकर हरिम शाहवर टीका केली.

एका न्यूज चॅनेलशी बोलताना हरिम म्हणाली की, तिने तिच्या मित्राला कानाखाली वाजवली. कारण तिचा संयम सुटला होता. त्याने माझ्याशी घाणरेडे वक्तव्य केले आणि माझ्याकडे त्याच्या सर्व वक्तव्याची रेकॉर्डिंग देखील आहे. दरम्यान, मुफ्ती अब्दुलने या आरोपांना फेटाळले आहे. मुफ्तीने सांगितले की, जेव्हा हरिमने थोबाडीत मारली, तेव्हा ते पलंगावर होते. तसेच हरिमसोबत अजून एक महिला होती. हरिमने मला थोबाडीत लगावली आणि दुसऱ्या महिलेने ते रेकॉर्ड केल्याचे मुफ्तीने म्हटले आहे.

याआधी मुफ्ती अब्दुल कवीचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत हरिमसोबत बोलताना दिसत होते. व्हिडीओ कॉलवर मुफ्ती कवीने सांगितले की, ते हरिम शाहला भेटू इच्छित होते मात्र, काही कारणास्तव ते भेटले नाही, मुफ्तीने हरिमचा चेहरा पाहण्यासाठी देखी बातचीत केल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये मुफ्ती हरिम शाहला महाराणी म्हणून बोलावतात. मुफ्ती पुढे म्हणाले की, महाराणी राग नको धरू, मला तुझा चेहरा दाखव. याला प्रत्युत्तर म्हणून हरिम बोलते की, ती बोगस लोकांचा चेहरा पाहू इच्छित नाही. काही महिने अगोदर मुफ्तीचा इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मुफ्ती कोरियन महिलेसोबत नृत्य करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओत मुफ्तीसोबत अजून एक व्यक्ती दिसत आहे.