आयोध्येत राम मंदिर बांधायला सोन्याची वीट देऊ, बाबरच्या वंशजाची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांच्या वंशजाने श्री रामाचे मंदिर बांधण्यासाठी सोन्याची वीट देण्याची तयारी दर्शविली आहे. बहादूर शाह जफर यांचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी आयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे अशी इच्छा जाहीर केली असून राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट आमच्या परिवाराकडून ठेवली जाईल असे म्हटले आहे.

मुघल राजघराण्याचे वंशज तुसी यांच्या म्हणण्यानुसार, बादशहा बाबरने सैनिकांना नमाज पढण्याची सोय व्हावी यासाठी अयोध्येत मशीद बांधली होती. सैनिकांशिवाय इतरांना तेथे नमाज पठण करण्याची परवानगी नव्हती. मशीद बांधण्यापूर्वी त्या जागेवर नेमके काय होते, या वादात मला पडायचे नाही; पण ती जागा हे श्री रामाचे जन्मस्थान असल्याचे सांगून समाजाचा एक वर्ग त्यावर दावा करीत असल्याने मला त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा.

Image result for राम मंदिर अयोध्या

कोणाकडेही अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकीची कागदपत्रे नाहीत. पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क मला नक्कीच आहे. कोर्टाने जर मला तसी परवानगी दिली तर अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन असेही मुघल वंशज तुसी म्हणाले.

तुकी यांनी असाच प्रस्ताव गेल्या सप्टेंबरमध्येही केला होता. अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वादावर आपले मांडण्याची याचिका नुकतीच तुसी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण कोर्टाने ही याचिका स्विकारली नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like