मुझसे शादी करोगे : संजना गलरानीनं सोडल्या ‘मर्यादा’, ‘आयटम साँग’ करण्यावरून हिना खानला म्हणाली ‘नाचणारीन’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वयंवर शो मुझसे शादी करोगे मध्ये मुलींमध्ये जबरदस्त कॅटफाईट होताना दिसत आहे. संजना गलरानी हिचं घरातील प्रत्येक मुलीसोबत भांडण होताना दिसत आहे. गेल्या एका एपिसोडमध्ये संजना गलरानीनं हिना पांचाळ हिच्यावर वादग्रस्त कमेंट केली होती. तिनं हिनाच्या प्रोफेशनवरून तिनं तिला खूप काही सुनावलं आहे.

संजना गलरानीच्या कमेंटनं वाद
संजना गलरानीनं हिना पांचाळ हिला नाचणारीनं म्हणून संबोधलं आहे. तिच्या आयटम नंबर करण्याची तिनं खिल्ली उडवली आहे. किचनमधील भांड्यांवरून संजना गलरानी आणि हिना पांचाळ यांच्यात वाद झाला होता. हिनानं यावेळी नवदीश आणि संजनावर कमेंट केली. तिनं म्हटलं की, तुम्ही दोघं एक्स्ट्रा बनूनच राहणार आहात. यानंतर संजना गलरानी जाम भडकली.

https://www.instagram.com/p/B94I40Iptjb/

यानंतर संजनाही हिनावर प्रचंड बरसली. संजना म्हणाली, “स्टार स्टार असतो आणि एक्स्ट्रा एक्स्ट्राच असतो. दिसत आहे की, 40 सिनेमाची हिरोईन कोण आहे. तू माझ्या बहिणीच्या सिनेमात एक आयटम साँग केलं आहे. दिसत आहे की, अ‍ॅक्ट्रेस कोण असतं. माझ्या बहिणीनं सांगितलं होतं की, तू पब्लिसिटीची भूकेली आहेस. तिनं सांगितलं होतं की, ती येईल तुला चिपकेल आणि तुझं नाव बर्बाद करेल.”

https://www.instagram.com/p/B93XuVVJGOZ/

पुढे संजना म्हणाली, “तू आयटम आहेस. आयटम वेगळी असते आणि स्टार वेगळी असते. मी एखादी नाचणारीनं नाही. तू बिग बॉसमध्ये गेलीस. तिथून बाहेर काय आलीस हिरोईन झालीस का. तू हिरोईन नाही झालीस कारण तुझ्यात त्या क्वालिटीज नाहीत. तुला कधीच कोणी हिरोईन म्हणून घेणार नाही.

https://www.instagram.com/p/B9wfPZ1Jb2i/

संजनाचं असं कमेंट करणं घरातही कोणाला आवडलं नाही. अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. शहनाज गिल हिलाही हा अ‍ॅटिट्युड आवडला नाही. शहनाजनंही हिनाला सपोर्ट केला. यानंतर पारसनं संजनाला समजावलं. तिला तोंडावर लगाम ठेवायला सांगितलं.

https://www.instagram.com/p/B8jbg4nBz82/

https://www.instagram.com/p/B8WkrNUBo5c/

https://www.instagram.com/p/B9hAugYpCPm/