Mujhse Shaadi Karoge : शहनाज गिलच्या ‘स्वयंवर’मध्ये सिद्धार्थ शुक्ला सहभागी होणार ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 चा विनर सिद्धार्थ शुक्ला आणि स्पर्धक शहनाज गिल यांच्या अफेअरची शोमध्ये खूपच चर्चा होताना दिसली. समोर आलेल्या माहितीनुसार, आता शहनाज गिलच्या मुझसे शादी करोगे या शोमध्ये सिद्धर्थ शुक्लाही सहभागी होणार आहे. मुझसे शादी करोगे या शोमधून शहनाज तिच्यासाठी लाईफ पार्टनरची निवड करणार आहे.

मुझसे शादी करोगे या शोचे रायटर शोभित सिन्हानं या माहितीची पुष्टी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विटही केलं होतं. सध्या त्याचं अकाऊंट डिअ‍ॅक्टीवेट असल्याचं दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला शहनाजचा हा शो होस्ट करणार आहे. परंतु शोभितचं इंस्टा अकाऊंट पाहिल्यानंतर मात्र असं वाटत आहे की, मनीष पॉल हा शो होस्ट करणार आहे. आता सिद्धार्थ नेमकं काय करणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. इतकेच नाही तर बिग बॉसचा स्पर्धक पारस छाबडाही मुझसे शादी करोगे या शोमध्ये त्याच्यासाठी वधू शोधणार आहे.

शोभितनं इंस्टावर फोटो शेअर करत लिहिलं होतं की, “आम्ही शहनाजची इमेज खराब होऊ देणार नाहीत. मला शहनाजच्या चाहत्यांच्या भावना कळत आहेत. हा शो फक्त एंटरटेंमेंटसाठी आहे. कृपया हा शो पहा आणि त्याला खूप सारं प्रेम द्या.”

शोभितनं आधीच कॉमेडी नाईट बचाओ, कॉमेडी सर्कस, एंटरटेंमेंट की रात असे शो लिहले आहेत. असं म्हटलं जात आहे की, शहनाजचं स्वयंवरही कॉमेडी सीरियल आहे. मुझसे शादी करोगे हा शो चाहते 17 फेब्रुवारीपासून सोमवारी ते शुक्रवारी रात्री 13.30 वाजता पाहू शकत आहेत.

You might also like