DIG सारख्या अधिकाऱ्यांनाही विचारत नसे सचिन वाझे, सॅल्यूट न मारता सँडविच खात रहायचा उभा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नवनवीन किस्से समोर येऊ लागले आहे. तपासात यापूर्वी गोष्टी उघड होत होत्या. मात्र आता पोलीस खात्यातील अधिकारी वाझेच्या करामतीबाबत बोलू लागले आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली तेव्हा डीआयजी दर्जाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र तत्पूर्वीच ती गाडी तेथून हटवण्यात आली होती. प्रोटोकॉलनुसार डीआयजी समोर येताच सचिन वाझेने सॅल्यूट करणं बंधनकारक होतं, परंतु सचिन वाझे सँडविच खात उभे होते, जेव्हा डीआयजीने वाझेला गाडीबाबाबत विचारणा केली असता त्याने मला माहीत नाही असे उत्तर दिले. एकूणच काय तर डीआयजीसारख्या अधिकाऱ्यांनाही वाझे भाव देत नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मते सचिन वाझे एक लबाड अधिकारी होता. त्यामुळे मनसुख हिरेन यांना गाडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्या गाडीत आठवड्यानंतर जिलेटिन ठेवणार आहेत याची हिंट दिली असेल असं वाटत नाही. ज्यावेळी अंबानींच्या घराबाहेर गाडी ठेवली त्यानंतर ४८ तासाच्या आतच तपास यंत्रणेच्या रडारवर सचिन वाझे आले. हे समजताच आपले भांडे फुटणार असे वाटू लागल्याने त्यांनी हिरेन यांच्यावर गुन्हा स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. मात्र या दबावाला हिरेन बळी पडले नाही. त्यामुळेच ४ मार्च रोजी वाझे आणि साथीदारांनी मनसुख हिरेन यांची हत्या केली. या प्रकरणात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे ४ मार्च रोजी वाझे त्यांचा मोबाईल मुंबई पोलीस मुख्यालयात ठेऊन चालत सीएसटीला गेले होते, सीएसटीच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही संध्याकाळी ७.०१ वाजता ते कैद झाले. एनआयएकडून याचा तपासा सुरु आहे.

वाझे सीएसटीकडे कसे पोहोचले याबाबत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिली म्हणजे टॅक्सी प्रवास आणि दुसरी म्हणजे लोकल प्रवास. कारण हिरेन यांची हत्या करण्याची वेळ फिक्स करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत वाहतुक कोडींत अडकण्याऐवजीवाझेने मुंबई ते ठाणे लोकल प्रवास केला. रात्री ८ च्या दरम्यान मनसुख हिरेन यांना कॉल आला होता, यावेळी वाहतूक कोंडीमुळे रस्तेमार्गाने ठाण्यात पोहचायला वेळ लागतो. सचिन वाझेभोवती संशयाची सुई फिरत असताना तपास यंत्रणांकडून वाझेला अटक का केली नाही? सचिन वाझे स्वत:ला वन मॅन आर्मी समजत होते असं काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

डीआयजी सारख्या अधिकार्याना सचिन वाझे एपीआय असतानाही महत्त्व देत नव्हते याचा अर्थ असा कि त्याच्यामागे मोठ्या आयपीएस किंवा बड्या राजकीय नेत्याचा हात असण्याची शक्यता आहे. असं वृत्त नवभारत टाईम्सने दिलं आहे.

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, किक्रेट बुकीवर छापा टाकायचा असेल तर कोणत्याही पोलीस स्टेशन अथवा क्राईम ब्रांचला डीसीपी अथवा अतिरिक्त सीपी यांची परवानगी घ्यावी लागते, परंतु कुठेही छापेमारी करायची असेल तर सचिन वाझेशी बोला, असं तोंडी आदेश काही दिवसांपासून मिळत होते. त्यातूनच १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांवर झाला असावा. दुसरीकडे सचिन वाझेकडे ८ महागड्या गाड्या असल्याचे समोर आले आहे. एपीआयच्या पगारात या गाड्या घेणं शक्य आहे का? मग त्या वाझेने कश्या घेतल्या असा प्रश्न उपस्थित होतो. एनआयएच्या तापसातून रोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाझे किती लबाड अधिकारी आहे हे समोर येत आहे.