काँग्रेसच्या ‘या’ उमेदवारासाठी चक्क मुकेश अंबानी मैदानात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा प्रचार करण्यासाठी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी मैदानात उतरले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात ही थेट लढत होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याचदरम्यान, काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी सर्वजण जोरदार तयारीला लागले आहे. याचबरोबर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी सुद्धा त्यांचा प्रचार करतांना दिसत आहेत.

काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये दक्षिण मुंबईसाठी मिलिंदच सर्वोत्तम आहे. मलिंदला दक्षिण मुंबईतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सखोल ज्ञान आहे. असे मुकेश अंबानी यांनी म्हंटले आहे. याचबरोबर मुंबईमधील छोट्या तसेच मोठ्या उद्योगांनी मुंबईची भरभराट झाली असल्याने आपण अधिक तरुण लोकांना येथे नोकऱ्यांची संधी देण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, दक्षिण मुंबई म्हणजे व्यवसाय असे समिकरण आहे. आपल्याला पुन्हा एकदा मुंबईमध्ये उद्योग व्यवसाय आणण्याची गरज असून तरुणांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. असे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांच्या सोबत कोटक ग्रुपचे उदय कोटक, लघुउद्योजक क्रिश रामणानी हे प्रचार करतांना दिसत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like