आजोबा बनण्याआधीच मुकेश अंबानीने खरेदी केली ‘एवढ्या’ कोटीची ब्रिटन खेळण्यांची कंपनी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी पेट्रोलियम, रिटेल आणि टेलिकॉमसारखे व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळल्यानंतर आता खेळणी बनवण्याचा व्यवसायात पाऊल टाकत आहे. त्यांनी ब्रिटनमधला हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचा ६.७९ कोटी पौंड म्हणजे जवळपास ६२० कोटी खेळण्यांचा ब्रॅंड रिलायन्सने विकत घेतला आहे. त्यामुळे अंबानी ग्रुपचा ‘टॉय मार्केट’ मध्येही दबदबा राहणार आहे, असे सुत्रांकडून समजले जात आहे.

रिलायन्स ब्रॅडचे चेअरमन आणि सीइओ दर्शन मेहता यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, जागतिक पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या हॅमलेजचा ब्रॅंड आणि व्यवसायाचे संपादन करुन रिलायन्स खेळणी व्यवसायात अव्वल क्रमांक प्राप्त करु शकेल. त्याचबरोबर ‘व्यक्तिगत पातळीवर हे माझ्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच आहे.’

हॅमलेजची मालकी असणाऱ्या सी बॅनर इंटरनॅशनल होल्डिंग्स या कंपनीसोबत मुकेश अंबानी यांनी गुरुवारी करार केला आहे. या करारामध्ये ‘हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्स लिमिटेड’ या कंपनीत १०० टक्के भागीदार करुन रिलायन्सने ही कंपनीच अघिग्रहित केली आहे. हॅमलेज ब्रॅंडची १८ देशात १६७ दुकाने आहेत. हॅमलेजची सर्वात मोठी फ्रॅन्चायझी भारतात रिलायन्सकडे होती. रिलायन्स २९ शहरांत ८८ दुकानासून या ब्रॅंडची खेळणी विकत होती.