…अन् तोच ‘दबदबा’ पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अडकले सचिन वाझे?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  एक दोन नव्हे, तर तब्बल 60 पेक्षा अधिक गुंडाना यमसदनी धाडलेल्या सचिन वाझेचा 1990 च्या दशकात पोलीस दलात मोठा दबदबा होता. मात्र ख्वाजा युनुस प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वाझेंची प्रतिमा डागाळली. 90 च्या दशकातला तोच दबदबा वाझेंना पुन्हा करायचा होता. अंबानीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीत सापडलेल्या धमकीच्या पत्रात कुछ तो बडा करना है असे वाक्य लिहले होते. यावरून पुन्हा चर्चेत येण्यासाठी वाझेंनी हे कृत्य केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन वाझेंना CIU या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली होती. हे खाते आयुक्तांच्या महत्वाच्या खात्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे याच खात्यात महत्वाचे गुन्हे वर्ग केल्याने चर्चेत नसलेले CIU पथक वाझेंमुळे चर्चेत आले. डीसी अवंतिका केस, फेक इन्स्टाग्राम फॉलोअर, ऋतिक रोशन बनावट ईमेल आयडी, TRP हे महत्वाचे गुन्हे त्यांच्याकडे सोपवले गेले. यातून वाझे पून्हा चर्चेत आले होते. मात्र ख्वाजा युनुस प्रकरणात त्यांची प्रतिमा डागाळली. त्यामुळे पुन्हा चर्चेत येण्यासाठी वाझेंनी स्फोटक ठेवण्याचे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. 1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझेची कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झाली. 2002 घाटकोपर स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी कोरोना काळात वाझेंना पुन्हा सेवेत घेतले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती केली होती.