मुकेश अंबानी यांनी नीता यांना केलं होतं फिल्मी स्टाईलने प्रपोज… अशी आहे मुकेश-नीता यांची प्रेमकहाणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या खासगी आयुष्यबद्दल लोकांना जाणून घेण्याची फार इच्छा असते. आज मुकेश अंबांनी यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी निगडीत काही अशा गोष्टींचा आढावा घेणार आहोत त्याबद्दल क्वचितच तुम्ही ऐकलं असेल. मुकेश आणि नीता अंबानी यांचं लग्न 1985 साली झालं होतं. याआधी एक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.

मुकेश अंबानीच्या आधी त्यांचे वडिल धीरूभाई अंबानी यांनी नीता यांना सून म्हणून पसंत केलं होतं. नीता एक भरतनाट्यम डान्सर आहे. धीरूभाई अंबनी यांनी एका कार्यक्रमात नीता यांना डान्स करताना पाहिलं होतं. त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या मुलासाठी (मुकेश) पसंत केलं होतं. नीता यांनी एका मुलाखतीत बोलताना याबाबत खुलासा केला होता.

https://www.instagram.com/p/Bh_Ze2wgBSC/?utm_source=ig_embed

नीता अंबानी म्हणतात की, “गुजराती कम्युनिटीच्या वतीने नवरात्रीमध्ये एक वार्षिक संमेलन झाले होते. मी त्या कार्यक्रमात सादरीकरण केलं होतं. मला अजिबात कल्पना नव्हती की कोणी मला नोटीस करत आहे. हा कर्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांनी घरी एक कॉल आला. त्यांनी म्हटले की, मी धीरूभाई अंबानी बोलत आहे. हे ऐकून मला असे वाटले की, कोणी माझ्यासोबत गंमत करत आहे.”

https://www.instagram.com/p/Bwd_YcoFo9Q/?utm_source=ig_embed

पुढे बोलताना नीता म्हणाल्या की, “मी धीरूभाई अंबानी बोलत आहे हे ऐकून मी लगेचच फोन कट केला. यानंतर पुन्हा कॉल आला. यानंतर पुन्हा ते म्हणाले की, मी धीरूभाई अंबानी बोलत आहे. त्यानंतर मी म्हणाले हा मी पण एलिझाबेथ टायलर बोलते आहे आणि फोन कट केला. धीरुभाई अंबानी यांनी पुन्हा तिसऱ्यांदा कॉल केला. यावेळी माझ्या वडिलांना फोन घेतला. अचानक त्यांचे हावभाव बदलले आणि ते मला म्हणाले की, ते खरंचच धीरूभाई अंबानी बोलत आहेत तू त्यांच्याशी व्यवस्थित बोलणार आहेस का ?”

https://www.instagram.com/p/Bwd-irAlgU2/?utm_source=ig_embed

पुढे नीता म्हणतात की, “त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. मी त्यांना भेटण्याआधी खूपच नर्व्हस होते. मी त्यांना भेटले त्यानंतर मी खूप प्रभावित झाले. मला ते खूपच सरळ स्वभावाचे वाटले. त्यानंतर त्यांनी मला डिनरसाठी आमंत्रित केलं. मग आम्ही संपूर्ण कुटुंब डिनरसाठी त्यांच्या घरी गेलो.

यानंतर धीरूभाई अंबानी यांनी मुकेश अंबानी यांना सांगितले की, तुझ्यासाठी मी मुलगी पसंत केली आहे. तुला आज तिला भेटायचं आहे. त्यामुळे तू जा आणि दरवाजा उघड. मुकेश यांनी दरवाजा उघडला त्यानंतर त्यांनी नीता यांना पाहिले. पाहता क्षणी मुकेश नीता यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते दोघे एकमेकांना जाणून घेऊ लागले. नीता मुकेश मर्सडिज कार सोडून डबल डेकर बसमधून प्रवास करायचे.

https://www.instagram.com/p/BkwUbZmA6ug/?utm_source=ig_embed

नीता ही पहिली मुलगी होती जिला मुकेश डेट करत होते. नीत यांनी सांगितले की, “मुकेश मला रोज एक गुलाबाचे फूल द्यायचे.” दोघेही मुंबईच्या गल्लीत स्ट्रीट फूड खायचे. त्यानंतर एके दिवशी मुकेश यांनी नीता यांना आपल्या कारमध्ये प्रपोज केलं. मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर मुकेश यांनी आपली कार थांबवली.

यानंतर मुकेश यांनी नीता यांना विचारले की, “तू माझ्याशी लग्न करशील का ?” त्यानंतर ते असेही म्हणाले की, “जोपर्यंत तू उत्तर देत नाही तोपर्यंत मी कार पुढे नेणार नाही.” मुकेश अंबानींच्या गाडीच्या मागे असणाऱ्या सर्व गाड्या हॉर्न वाजवून वैतागल्या. परंतु मुकेश नीता यांच्या उत्तराची वाट पाहत होते. मग काही वेळाने नीता यांनी मुकेश यांना होकार दिला. त्यानंतरच मुकेश यांनी कार पुढे नेली.