×
Homeताज्या बातम्याMukesh Ambani Meets CM Eknath Shinde | अंबानी-शिंदे यांची ’वर्षा’वर रात्री उशिरा...

Mukesh Ambani Meets CM Eknath Shinde | अंबानी-शिंदे यांची ’वर्षा’वर रात्री उशिरा भेट, चर्चेला उधाण! कमालीची गुप्तता पाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mukesh Ambani Meets CM Eknath Shinde | दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे (BJP) निकटवर्तीय उद्योगपती गौतम आदानी (Industrialist Gautam Adhani) यांनी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. आता आणखी एक भाजपाचे निकटवर्तीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट (Mukesh Ambani Meets CM Eknath Shinde) घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. देशातील मोठे उद्योगपती शिंदे आणि ठाकरे यांना का भेटत आहेत, याबाबत तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहे.

 

शनिवारी रात्री जवळपास साडेबारा वाजताच्या सुमारास रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance Industries Group) सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ’वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजलेले नाही. परंतु या भेटीबाबत मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती.

 

माध्यमांना समजू नये म्हणून रात्री उशिरा भेटीची वेळ ठरविण्यात आली होती.
शनिवारी साडेबारा वाजताच्या सुमारास मुकेश अंबानी ’वर्षा’वर दाखल झाले.
या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

उद्धव ठाकरे – गौतम अदानी भेटीनंतर आता मुकेश अंबानी – एकनाथ शिंदे भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत
असून पडद्यामागे नेमक्या कोणत्या घडामोडी सुरू आहेत हे लवकरच समजू शकते.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील लाखो तरुणांची रोजगाराची संधी गेली.
यावरून राज्यात संताप व्यक्त होत आहे. यानंतर उद्योगपती आणि राजकीय नेत्यांमध्ये होत असलेल्या भेटीगाठी महत्वाच्या ठरत आहेत.

 

Web Title :- Mukesh Ambani Meets CM Eknath Shinde | mukesh ambani meets chief minister eknath shinde late at night on varsha what is the real reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या पालकमंत्री पदाची मिळाली जबाबदारी

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News