’अफजल’ बनून विष्णुने दिली होती Mukesh Ambani यांना धमकी, अटकेनंतर झाला खुलासा

नवी दिल्ली : Mukesh Ambani | रिलायन्स ग्रुप (Reliance Group) चे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या 56 वर्षीय विष्णू विभू भौमिक (Vishnu Vibhu Bhowmik) ला पोलिसांनी पकडले आहे. डीसीपी नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या ताब्यात आलेला हा व्यक्ती व्यवसायाने ज्वेलर्स (Jeweller) असून त्याचे दक्षिण मुंबईत दुकान आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये कॉल करताना त्याने आपले नाव अफजल सांगितले होते. (Mukesh Ambani)

 

9 वेळा केला धमकीचा फोन

रिपोर्टनुसार, हा व्यक्ती दहिसर (Dahisar) चा रहिवासी आहे आणि त्याने सोमवारी सकाळी 10.39 ते दुपारी 12 वाजेदरम्यान एक-दोन नव्हे तर नऊ वेळा आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना फोन केला. त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. (Mukesh Ambani)

 

केंद्रीय यंत्रणाही झाल्या सतर्क

मुंबईतील गिरगाव परिसरात असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात (Reliance Foundation Hospital) सकाळी 10.39 च्या सुमारास पहिला कॉल करताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींनाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस सतर्क झाले आणि कलम 506(2) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काही केंद्रीय यंत्रणांनीही यासंदर्भात माहिती घेतली आहे.

 

डीएम मार्ग पोलिस ठाण्यात सुरू आहे चौकशी

डीसीपी नीलोत्पल (DCP Nilotpal) यांच्या वतीने आरोपीच्या कोठडीबाबत सांगण्यात आले की, विष्णू विभू भौमिकला बोरिवली पश्चिम येथून पकडून डीएम मार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. येथे त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. डीसीपी म्हणाले, आम्ही या व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड देखील तपासत आहोत. धमक्या देताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींचेच नाव घेतले नाही, तर एकदा कॉलमध्ये धीरूभाई अंबानींचे (Dhirbubhai Ambani) नावही घेतले होते.

 

गेल्या वर्षीही समोर आले होते एक प्रकरण

याआधी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देखील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान
अँटिलिया बाहेर एक संशयास्पद एसयूव्ही कार सापडली होती,
ज्यामध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. संशयास्पद कार सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसशिवाय एनआयएनेही या प्रकरणात तपास केला होता.

 

Web Title :- Mukesh Ambani | mukesh ambani threat case mumbai police arrested the man who threatened by phone call

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा