Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला विक्रम, एक दिवसात झाला तब्बल 60 हजार कोटीचा फायदा

नवी दिल्ली : Mukesh Ambani | आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेयरमध्ये 4 टक्केपेक्षा जास्त तेजी दिसून आली आहे. ज्यामुळे कंपनीचा शेयर विक्रमी 52 आठवड्यांच्या ऊंचीवर पोहचला. सोबतच कंपनीची मार्केट व्हॅल्यू 15 लाख कोटीच्या पुढे गेली. प्रत्यक्षात कंपनीने आपला आपला एक वर्ष जुना विक्रम मोडत नवीन विक्रम स्थापन केला. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्सच्या शेयरमध्ये जुलैच्या अखेरपासून आतापर्यंत 13 टक्केची तेजी दिसून आली आहे. तज्ज्ञांनुसार रिलायन्सच्या शेयरमधील तेजीमुळे रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओला लाभ झाला आहे.

52 आठवड्यांच्या विक्रमी उंचीवर पोहचले रिलायन्सचे शेयर
बीएसईच्या आकड्यांनुसार 4.12 टक्के म्हणजे 94.60 रुपयांच्या तेजीसह रिलायन्सचा शेयर 2388.25 रुपयांवर बंद झाला. जर व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर 2394.20 रुपयांसह 52 आठवड्यांच्या विक्रमी स्तरावर पोहचला होता. तर आज सकाळी कंपनीच्या शेयरची सुरूवात तेजीने झाली होती. काल कंपनीचा शेयर 2293.65 रुपये प्रति शेयरवर बंद झाला होता.

15 लाख कोटींची झाली कंपनी
तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक विक्रम केला आहे. आकड्यांनुसार, आज कंपनीचे मार्केट कॅप 15 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. पहिल्यांदा आणि शेवटचे कंपनीचे मार्केट 15 लाख कोटींच्या पुढे मागील वर्षी कंपनीच एजीएम म्हणजे रिलायन्स एजीएम 2020 चा दिवस पहायला मिळाला.

रिलायन्स देशातील पहिली अशी कंपनी आहे जिचे मार्केट कॅप 15 लाख कोटीच्या पुढे गेले आहे. बाजार बंद होईपर्यंत मार्केट कॅप 15,14,017.50 कोटीवर होते.

हे देखील वाचा

e-Shram Portal | फायद्याची गोष्ट ! आजच करा e-Shram Portal वर आपले ‘रजिस्ट्रेशन’ आणि घ्या अनेक सरकारी लाभ; जाणून घ्या

Pune Court | मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे; पत्नी आणि मुलानेही केली मदत, जाणून घ्या आज कोर्टात काय झालं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mukesh Ambani | mukesh ambanis reliance created a record gain about 60000 crores in one day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update