‘कोरोना’चा कहर ! मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2 महिन्यात 28 टक्क्यांची ‘घट’, जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 8 स्थानांनी ‘घसरण’

मुंबई : वृत्तसंस्था –  देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीत मागील दोन महिन्यात 28 टक्क्यांची घट झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात तीव्र घट झाल्याने अंबानींच्या संपत्तीत घट झाली आहे. Hurun Global Richl List नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांची संपत्ती फेब्रुवारी-मार्चच्या कालाधीत 19 अब्ज डॉलर्सने घटली आहे. यामुळे जगातील 8 व्या स्थानावर असलेले मुकेश अंबानी आता 17 स्थानावर गेले आहेत.

या अहवालानुसार, अंबानी यांच्या व्यतिरिक्त गौतम अदानी, शिव नादर आणि उदय कोटक यांच्या संपत्तीत देखील प्रचंड घट झाली आहे. या अहवालानुसार, अदानी यांची 6 अब्ज डॉलर्स (37 टक्के), एसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नादर याची संपत्ती 5 अब्ज डॉलर्स (26 टक्के) आणि बँकर उदय कोटक यांची संपत्ती 4 अब्ज डॉलर्स (2 टक्के) घटली आहे.

जगातील श्रीमंताच्या यादीनुसार जगातील 100 श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधून हे तीन उद्योगपती बाहेर पडले आहेत. यामध्ये फक्त अंबानी यांचे नाव आहे. मागील दोन महिन्यात भारताच्या शेअर बाजारात जवळपास 25 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. कोरोना आणि सध्याच्या जगभरातील शेअर्सच्या विक्रीमुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर बाजारात 26 टक्क्यांची घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 5.2 टक्क्यांनी घसरल्यामुळे भारताच्या अव्वल उद्योगपतींना याचा मोठा फटका बसला आहे, असे हरून रिपोर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनु रहमान यांनी सांगितले. मुकेश अंबानी यांची संपत्ती 28 टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवालात नोंदवण्यात आले आहे.