मुकेश अंबानींच्या जीवनाशी जुडलेल्याया गोष्टी तुम्हाला माहित आहेत काय ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी यांच्याबद्दल कायम सर्वांना उत्सुकता असते की या श्रीमंत व्यक्तीचे जीवन कसे असेल किंवा त्यांचे आधीचे जीवन कसे असेल. मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 साली यमनच्या अदन मध्ये झाला. त्याचे वडील धीरुभाई अंबानी हे यमनमध्ये छोटा व्यवसाय करत होते. हे तर अनेक जणांना माहिती आहे, परंतू खूप कमी लोकांना मुकेश अंबानी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेलेले मुकेश अंबानी शिक्षणानंतर पुन्हा भारतात परतले आणि वडीलांंना उद्योगात मदत केली.

मुकेश अंबानी असे एकटे उद्योजक आहेत ज्यांना झेड सिक्युरिटी देण्यात आली आहे. ही देशातील सर्वात कडक सिक्युरिटी आहे, ज्यावर दर महिन्याला 15 ते 16 लाख रुपये खर्च होतात.
मुंबईतील त्याचे घर एंटीलिया सर्वात महागडे खासगी रेसिडंट आहे. यामध्ये जगभरातील सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यावर तीन हेलिपॅड, थिएटर, टेरेस गार्डेन, 168 कारसाठी पार्किंग आणि घरातील कामांसाठी 600 लोकांचा स्टाफ उपलब्ध आहे.

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी जगातील सर्वात युवा कोट्याधीश मधील एक आहे. 2008 मध्ये फोर्ब्सने त्यांना टॉप टेन मध्ये बिलेनिअरच्या यादीत दुसऱ्या स्थानी दर्शवले होते. मागील वर्षी ईशा अंबानी यांचे लग्न आनंद पीरामल यांच्याशी झाले.

मुकेश अंबानी यांच्या वडीलांनी नीता यांना एका डान्स प्रोग्राममध्ये पाहिले होते, त्यानंतर त्यांनी पाहिले की ती त्यांचा मुुलाला भेटायला आली आहे. त्यानंतर निता आणि मुकेश यांचे लग्न 1984 मध्ये झाले. त्यांना तीन मुले आहेत त्याचे नाव आकाश, ईशा आणि अनंत अंबानी.

आरोग्यविषयक वृत्त –