अनिल अंबानींसाठी मुकेशअंबानींनी उचललं ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुकेश अंबानीच आपल्या भावाची कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशनची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्राटेलच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी पुढे आले आहोत. यावर मुकेश अंबानीनी बोली देखील लावली आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेंतर्गंत रिलायन्स इन्फ्राटेलनच्या मोबाइल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर अ‍ॅसेट्सची विक्री केली जाणार आहे.

यासाठी भारती एअरटेलने देखील प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव 1,800 कोटी रुपयांचा आहे. याशिवाय यूव्ही अ‍ॅसेट्स रिकंस्ट्रक्शन लिमिटेड, व्हीएफएसआय होल्डिंग्स यांनी बोली लावली आहे.

एनसीएलटीने दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10 जानेवारी 2020 ही वयोमर्यादा ठेवली आहे. भारती एअरटेलने दिलेला प्रस्ताव काही अटी आणि शर्थीसह दिल्याने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या वेळेच्या मर्यादित हा व्यवहार पूर्णत्वास जाणे शक्य होणार नाही. आरकॉम 33 हजार कोटी रुपयांच्या सिक्युअर्ड कर्ज आहे. याशिवाय कर्जदारांनी ऑगस्टमध्ये 49,000 कोटी रुपयांचे दावे केले आहेत.

Visit : Policenama.com