काय सांगता ! होय, सर्व सरकारी कंपन्यांपेक्षा ‘रिलायन्स’ची संपत्ती जास्त, अंबानींचा नवा विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी रोज नवनवीन शिखर घाटत आहे.देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद झाली आहे. भारत सरकारच्या मालकीच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यांची मिळून जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती एकट्या रिलायन्स कंपनीची आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल हे भारत सरकारच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यापेक्षा जास्त आहे. जानेवारी २०२० ते आतापर्यंत रिलायन्सच्या शेअर मध्ये ५४. ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुगल, फेसबुक आणि सिल्वर लेक सारख्या मोठ्या कंपन्यांनी अंबानींच्या जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केल्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशातील ८३ सार्वजनिक कंपन्याचे एकूण बाजार भांडवल १५.१६ लाख कोटी आहे. तर एकट्या मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे बाजार भांडवल १५.३० लाख कोटी इतके आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देशातील सर्व कंपन्यांचे मार्केट कॉपिटल रिलायन्सपेक्षा दुप्पट होते.सर्व सरकारी कंपन्यांचे बाजार भांडवल १९.३ लाख कोटी होते तर मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे भांडवल ९.६ लाख कोटी इतके होते. रिलायन्सने इक्विटी कॉपिटलच्या माध्यमातून ३३ बिलियन डॉलर इतकी रक्कम गेल्या ६ महिन्यात मिळवली आहे.

रिलायन्सचे मार्केट कॉपिटल २०७.८ बिलियन डॉलर इतके आहे. भारत जगातील १०व्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट आहे. त्याचे व्हॅल्यूएशन २.११ ट्रिलियन इतके आहे.भारत सरकारच्या मालकीची असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॉपिटल १.७९ लाख कोटी एवढे आहे. जे रिलायन्स कंपनीपेक्षा खूप कमी आहे. टाटा समूहाच्या टीसीएस कंपनीचे मार्केट कॉपिटल ९.३५ लाख कोटी इतके आहे. रिलायन्सनंतर मार्केट कॉपिटल मध्ये टीसीएस कंपनीचा नंबर लागतो.