Mukesh Ambani | RIL, Jio च्या मुकेश अंबानी यांचा नवा ‘विक्रम’ ! बनले पहिले भारतीय, ज्यांची संपत्ती 100 अरब डॉलरच्या पुढे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mukesh Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची एकुण संपत्ती मंगळवारी 100 अरब डॉलरच्या पुढे गेली. ते पहिले भारतीय आहेत, ज्यांची संपत्ती 100 अरब डॉलरच्या पुढे पोहचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेयरच्या किमतीने उसळी घेतल्याने मागील काही दिवसात अंबानी यांच्या संपत्तीत खुप वेगाने मोठी वाढ झाली आहे. सोमवारी आरआयएलच्या शेयरची किंमत 52 आठवड्याच्या उच्च स्तरावर म्हणजे रु. 2480 वर पोहचली होती.

ब्लूमबर्ग बिलेनियर इन्डेक्स (Bloomberg Billionaires Index) नुसार, केवळ शुक्रवारी मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये 3.7 बिलियन डॉलरची विक्रमी वाढ आली.
शेयरमध्ये तेजीच्या कारणामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे मार्केट कॅप सुद्धा 15 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

मार्केट व्हॅल्यूच्या हिशेबाने सर्वात मोठ्या कंपनीच्या शेयर सेन्सेक्सच्या शेयर्समध्ये सर्वाधिक लाभात राहिला. मार्केट कॅपिटलचा हा स्तर मिळवणारी रिलायन्स देशातील पहिली कंपनी आहे.

या तेजीनंतर अपेक्षा व्यक्त केली जात होती की, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी लवकरच 100 अरब डॉलरच्या आकड्याला स्पर्श करतील.
सध्या ते जगात श्रीमंतांच्या यादीत 11व्या स्थानावर आहेत.
अंबानी सध्या जगातील दिग्गज गुंतवणुकदार वॉरेन बफे (Warren Buffett) यांच्यापासून केवळे थोडेच मागे आहेत.
बफे यांची एकुण संपत्ती 102.6 बिलियन डॉलर आहे.

 

Web Title : Mukesh Ambani | ril jio mukesh ambani became first indian whose wealth crossed 100 billion dollar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Narayan Rane | केंद्रीय मंत्री राणेंच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

Ratan Tata | लग्नपत्रिका छापण्यापूर्वीच मोडला होता रतन टाटा यांचा साखरपुडा, जाणून घ्या पूर्ण किस्सा

ACB Police Inspector Transfer | अ‍ॅन्टी करप्शन विभागातील 34 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या अन् नियुक्त्या