भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणी भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आमदार राम कदम यांनी वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करण कोणाचा हेतू होता? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझेंची उघड वकिली का करत आहेत ? वाझेंचा बचाव कशासाठी केला जात आहे? गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला वाचवणे योग्य आहे का ? असे सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत.

ठाकरे सरकार मंबई महापालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करतंय का? या दिशेनं तपास करण्याची हिंमत दाखवली जाणार का? या दृष्टीन तपास व्हावा अशी आमची मागणी असल्याचे आमदार कदम यांनी म्हटले आहे. देशातील कोट्यवधी लोकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणा-या उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याचे कारण काय ? एक साधारण एपीआय दर्जाचा अधिकारी इतकं मोठं षडयंत्र एकटा रचू शकतो का ?असे सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत.