Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mukesh Ambani Succession Plan | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) वीस वर्षांपासून भारतातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे प्रमुख आहेत. 2002 मध्ये वडील धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या निधनानंतर, भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स समूहाची (Reliance Group) सूत्रे मुकेश अंबानी यांच्या हातात आली. (Mukesh Ambani Succession Plan)

 

त्यांच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स इंडस्ट्रीजने पारंपारिक व्यावसायाव्यतिरिक्त रिटेल (Retail) आणि टेलिकॉम (Telecom) सारख्या क्षेत्रांमध्ये यश मिळवले आणि लक्षणीय प्रवेश केला. मुकेश अंबानी आता 65 वर्षांचे असल्याने ते आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योग साम्राज्य तीन मुलांमध्ये विभागण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत.

 

वारसाहक्क सोपविण्याची झाली सुरुवात

मुकेश अंबानी यापूर्वीच सक्सेशन प्लानवर बोलले आहेत. गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फॅमिली डे फंक्शन (Reliance Family Day Function) मध्ये त्यांनी याचे स्पष्ट संकेत दिले होते.

मुकेश अंबानी या कार्यक्रमात म्हणाले होते की, आता नवी पिढी नेतृत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी तयार आहे. आपण त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, त्यांना सक्षम केले पाहिजे आणि प्रोत्साहित केले पाहिजे. आपण आरामात बसून नवीन पिढी आपल्यापेक्षा चांगली कामगिरी करताना पाहिली पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे. (Mukesh Ambani Succession Plan)

आता त्यांनीही या दिशेने पुढाकार घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) चे अध्यक्षपद सोडले असून त्यांची जागा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) ला देण्यात आली आहे.

 

आकाश अंबानीकडे दिली ही जबाबदारी

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (Reliance Jio Infocom Ltd) ने मंगळवारी स्टॉक एक्सचेंज (Share Markets) ला सांगितले की मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या बोर्डाचा राजीनामा दिला आहे.

27 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतरच त्यांचा राजीनामा वैध ठरला आहे. यासोबतच कंपनीने आकाश अंबानी यांना बोर्डाचे अध्यक्ष बनवण्याचीही माहिती दिली होती. ब्राउन यूनिवर्सिटी (Brown University) मधून अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या आकाश अंबानीपूर्वी त्यांचे वडील मुकेश अंबानी रिलायन्स जिओचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

मुकेश अंबानी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा आणि आकाश अंबानी यांची नियुक्ती याकडे नेतृत्व नव्या पिढीकडे सोपवण्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. मात्र, मुकेश अंबानी हे जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (Jio Platforms Ltd) चे चेअरमन म्हणून कायम राहणार आहेत.

 

तिन्ही मुलांना मिळेल समान वाटा

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, पहिल्यांदा मुकेश अंबानी निवृत्तीची तयारी (Mukesh Ambani Succession Plan) करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
नंतर ब्लूमबर्गनेही एका विशेष अहवालात अशीच माहिती दिली.

तेव्हा म्हटले जात होते की, तेलापासून ते रिटेलपर्यंत अफाट पसरलेल्या उद्योगांची विभागणी कशी करायची आणि कोणावर कोणती जबाबदारी द्यायची हे ठरवण्यासाठी फॅमिली कौन्सिल स्थापन करण्याची योजना असल्याचे बोलले जात होते.

तीन मुलांपैकी प्रत्येकाला समान वाटा आणि प्रतिनिधित्व मिळावे, अशी जबाबदारी कौन्सिलला मिळावी.
रिलायन्सने तेव्हा या वृत्तांचे खंडन केले असले तरी,
एक दिवसापूर्वीच्या हालचालीवरून असे दिसून येते की मुकेश अंबानी केवळ सक्सेशन योजनेचा खरोखरच विचार करत नाहीत तर त्यांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

 

आपल्या पिढीतील वादातून अंबानींनी घेतला बोध

2002 मध्ये वडिलांच्या निधनानंतर मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजची जबाबदारी सांभाळत आहेत.
मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन झाल्यापासून भारतीय कॉर्पोरेट जगतात अनेक कुटुंबे वादाने ग्रासली होती.

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून बराच काळ वाद सुरू होता.
यासंदर्भात सार्वजनिक विधानेही झाली होती, जी नंतर आई कोकिलाबेन अंबानी (Kokilaben Ambani) यांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आली.
मुकेश अंबानी आता नव्या पिढीवर जबाबदारी सोपवताना अशा कोणत्याही वादाची शक्यता सोडू इच्छित नाहीत.

 

तीन मुलांपैकी कोणाला काय मिळेल ते जाणून घ्या

असे सांगितले जात आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योग साम्राज्य तीन मेजन व्हर्टिकलमध्ये सक्सेशन योजनेअंतर्ग विभागले गेले आहे.
सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स (Oil Refining and Petrochemicals),
रिटेल (Retail) आणि डिजिटल सर्व्हिसेस (Digital Services) या तीन व्हर्टिकलमध्ये विभागलेला आहे.

रिटेल आणि डिजिटल उद्योगासाठी आधीच पूर्ण मालकीच्या उपकंपन्या बनवल्या आहेत.
पेट्रोकेमिकल आणि रिफायनिंग व्यवसाय मूळ कंपनीच्या अंतर्गत आहे.
याशिवाय ग्रीन एनर्जीचा नवीन उद्योगही मूळ कंपनीकडे आहे.
तीन व्हर्टिकलला असे विभागले आहे की त्यांचे मूल्य देखील जवळजवळ समान आहे.
आकाश अंबानी यांना डिजिटल व्हर्टिकल सोपवण्यास सुरुवात झाली आहे.

ईशा अंबानी (Isha Ambani) यांना रिटेल व्हर्टिकलमध्ये पुढे नेले जात आहे.
अशा प्रकारे, अनंत अंबानींसाठी (Anant Ambani) पारंपारिक पेट्रोकेमिकल, रिफायनरी आणि ग्रीन एनर्जी शिल्लक राहते.
मात्र, हा प्लान प्रत्यक्षात कसा राबवला जातो, हे येणारा काळच सांगू शकेल.

 

Web Title :- Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा