अंबानी, कोटक, मित्तल यांचे लाखो कोटी ‘बुडाले’, पण ‘या’ व्यवसायिकाच्या संपत्तीत झाली ‘वाढ’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – शेयर मार्केट कोसळल्याने देशातील तमाम उद्योगपतींचे मोठे नुकसान झाले आहे. मुकेश अंबानी, अजीम प्रेमजी, उदय कोटक, मित्तल यांचे लाखो करोडो रूपयांचे नुकसान झाले, परंतु देशात एक असेही उद्योगपती आहेत, ज्यांच्यावर या त्सुनामीचा परिणाम झाला नाही. त्यांचे नाव आहे, सुपरमार्केट चेन डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी.

संपत्तीत 416 मिलियन वाढ
शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर त्यांच्या एकुण संपत्ती 10.10 अरब डॉलर होती. मागच्या एक वर्षात त्यांच्या संपत्तीत 416 मिलियन डॉलर (सुमारे 2900 करोड)ची वाढ झाली आहे. राधाकिशन दमानी यांची कंपनी डी-मार्टचे शेयर सध्या जोरात आहेत. 13 मार्च 2019 च्या तुलनेत शेयर मध्ये 8.64 टक्के तेजी आहे. आजसुद्धा या कंपनीच्या शेयरमध्ये 4.81 टक्के (96.50 रुपये) वाढ झाली.

अंबानींच्या संपत्तीला 19 अरब डॉलरचे नुकसान
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 19 अरब डॉलरची घसरण झाली आहे. ते आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. संपत्तीला झालेल्या नुकसानीनंतर मुकेश अंबानी जगात पाचव्या स्थानावर आहेत.

रिलायन्सची किंमत 40 अरब डॉलर
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे मार्केट क्रॅशमुळे शेयरच्या किंमतीव आणखी दबाव वाढला. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सुमारे 32 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची किंमत 40 अरब डॉलर ठरवण्यात आली. मागच्या एका वर्षाच्या तुलनेत यामध्ये 18.6 अरब डॉलरची घसरण झाली आहे.

प्रेमजी यांचे 3.23 अरब डॉलरचे नुकसान
अन्य भारतीय उद्योगपतींबाबत बोलायचे तर विप्रोचे अजीम प्रेमजी यांच्या संपत्तीला 3.23 अरब डॉलर ( एकुण 15.10 अरब डॉलर), एचसीएलचे शिव नडार यांच्या संपत्तीचे 2.27 अरब डॉलर (एकुण 13.5 अरब डॉलर), उदय कोटक यांच्या संपत्तीचे 2.41 अरब डॉलर (एकुण 12.4 अरब डॉलर), लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीचे 4.53 अरब डॉलर (एकुण 8.64 अरब डॉलर) नुकसान झाले आहे.

गुंतवणुकदारांचे बुडाले 46 लाख करोड रुपये
कोरोनामुळे शेयर बाजारातील गुंतवणुकदाराचे सुमारे 46 लाख करोड रुपये बुडाले आहेत. जानेवारीमध्ये जेव्हा बाजारा उच्च पातळीवर होतो, तेव्हा बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकुण मार्केट कॅप 159.28 लाख करोड होते. 38 व्यवहारांच्या सत्रांमध्ये हे घसरून 113.49 लाख करोडवर पोहचले.