Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance Group of Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यालयात फोन करुन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी बिहारमधील (Bihar) दरबंगा शहरातून आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

बिराहमधील दरभंगा जिल्ह्यातील मनीगाछी येथून एकाला या प्रकरणी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राकेश कुमार मिश्रा (Rakesh Kumar Mishra) असं आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दरभंगा पोलिसांच्या (Darbhanga Police) मदतीनं आरोपीला अटक केली. आरोपीवर आयपीसीच्या कलम 506(2), 507 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीला आता मुंबईत आणण्यात येत आहे.

बुधवार (दि.5) दुपारी एकच्या सुमारास रिलायन्सच्या सर एचएन हॉस्पिटलच्या (Sir HN Hospital) लँडलाईनवर एक अज्ञात नंबर वरून कॉल आला होता. रिलायन्स हॉस्पिटल मध्ये बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची तातडीने दखल घेत तपास सुरु केला. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

दरम्यान, यापूर्वी बिष्णू विदू भौमिक Bishnu Vidhu Bhowmik (वय-56) या व्यक्तीने मुकेश अंबानी
आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
आरोपी हा दक्षिण मुंबईतील असून त्याचे ज्वेलरीचे दुकान आहे.
आरोपीने ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर फोन करुन धमकी दिली होती.

Web Title :- Mukesh Ambani | young man arrested from bihar for threatening ambani family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा