Mukesh Ambanis Corona Vaccine | मुकेश अंबानी यांच्या कोरोना व्हॅक्सीनला मिळाली क्लिनिक ट्रायलची मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Mukesh Ambanis Corona Vaccine | मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स लाईफ सायन्सेस (Reliance Life Sciences) कडून तयार केल्या जात असलेल्या कोरोना व्हॅक्सीन (Mukesh Ambanis Corona Vaccine) ला ड्रग कंट्रोलर (Drug Controller) कडून क्लिनिकल ट्रायल (clinical trial) साठी मंजूरी मिळाली आहे. ही दोन डोसची रिकॉम्बिनेंट प्रोटीन-बेस्ड व्हॅक्सीन (recombinant protein-based vaccine) आहे.

एसईसीच्या बैठकीत रिलायन्स लाईफच्या अर्जाचे अवलोकन झाले आणि मंजूरी देण्यात आली.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार रिलायन्सने आपल्या प्रस्तावित व्हॅक्सीनच्या फेज-1 ट्रायलसाठी ड्रग रेग्युलेटरशी संपर्क केला होता.
रिलायन्स लाईफ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची अधिकृत कंपनी आहे.
जी काही दिवसांपासून व्हॅक्सीनवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या फेजची होणार ट्रायल

टॉलरेटेड डोसच्या ताकदीच्या चाचणीसाठी सामान्यपणे फेज-1 ट्रायल 58 दिससांची असते.
जी पूर्ण झाल्यानंतर फेज 2 आणि फेज 3 साठी ट्रायलसाठी अर्ज केला जातो.

आतापर्यंत 6 व्हॅक्सीनला इमर्जन्सी वापरासाठी परवानगी

देशात सर्वात जास्त वापर सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या कोविडशील्ड आणि भारत बायोटेक कोव्हॅक्सीननचा होत आहे.
तर भारतात इमर्जन्सी वापरासाठी रशियाची स्पूतनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनला परवानगी दिली आहे.

अवलोकन बैठकीत राज्यांना सल्ला

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी कोविड -19 व्हॅक्सीनेशनच्या प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी सर्व राज्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
ज्यामध्ये राज्यांना सल्ला देण्यात आला की, त्यांनी दुसर्‍या डोसचे कव्हरेज वाढवण्यासह शालेय शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या लसीकरणाकडे लक्ष द्यावे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Narayan Rane | दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार – नारायण राणे

Union Minister Narayan Rane | ‘आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ’

Shivsena Vs MNS | मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका