मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपुढे नाही टिकत दोन्ही व्याही

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन- मुंबईमध्ये आनंद पिरामल आणि ईशा अंबानीचे लग्न झाले. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाचे लग्न पीरामल ग्रुपचे हेड अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत झाले. तर त्यांचा मुलगा आकाश अंबानी याचे लग्न हीरे व्यापारी आणि रोजी ब्लूचे ओनर रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्या सोबत होणार आहे. आकाश आणि ईशाचे लग्न लग्नामुळे मुकेश अंबानी यांचे नाते दोन मोठ्या कॉरपोरेट घराण्सासोबत जोडले गेले आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की मुकेश अंबानी त्यांच्या होणाऱ्या व्याहींपेक्षा 8 पटीने श्रीमंत आहेत. पीरामल आणि मेहता या दोन्ही कुटुंबांची नेटवर्थ मिळून अंदाजे 5 अब्ज डॉलर आहे तर, एकट्या मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 42 अब्ज डॉलर आहे.

श्रीमंत लोकांच्या यादीतील रँकिंग

मुकेश अंबानी

देशातील श्रीमंत लोकांच्या यादीतील रँकिंग – 1

रसेल मेहता

देशातील श्रीमंत लोकांच्या यादीतील रँकिंग–229

अजय पीरामल
– फोर्ब्स मॅगझीननुसार पीरामल ग्रुपचे हेड अजय पीरामल यांची संपत्ती 490 कोटी डॉलर (33 हजार कोटी रूपये आहे). ते देशातील श्रीमंत लोकांच्या यादीतच येत नाहीत तर त्यांचे फॉर्मास्युटिकल्स, पॅकेजिंग, रीअल एस्टेट आणि फायनांशिअल सर्विसेजचे व्यवसाय जगभरातील 100 पेक्षा जास्त शहरात पसरलेले आहे. ते भारतात 22व्या आणि जगभरात 404व्या श्रामंत व्यक्तींमध्ये आहेत. त्यांची पत्नी व्यवसायाची व्हाईस चेअरवूमन आहे तर त्यांची मुले आनंद आणि नंदिनी बोर्ड मेंबर्स आहेत.

रसेल मेहता

– बेल्जियम बेस्ड रोजी ब्लू मेहता कुटुंबाची कंपनी आहे आणि ही जगातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. त्यांची रिटेल डायमंड ज्वेलरी ब्रांड ऑरा आहे. पहीले त्यांची कंपनी हीरोची ट्रेडिंग करत होती. 1973 मध्ये जेव्हा रसेल मेहता यांनी कंपनीची दोर सांभाळली तेव्हा त्यांनी कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. त्यांनी त्यांच्या ग्लोबल डिस्ट्रीब्यूशन आणि डायमंड सोर्सिंग वाढवले. आता रोजी ब्लूच्या दोन कंपनी आहेत ज्यात एक इंडिया रोजी ब्लू (इंडिया) आणि दूसरी वर्ल्डच्या दुसऱ्या देशात व्यवसाय करत आहे. ईटीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये रसेल मेहता यांनी सांगितले की, रोजी ब्लू फॅमिली कॉरपोरेशन आहे ज्यात सगळ्या प्रोफेशनल्सला ट्रेन्ड केले आहे. साल 2011-12 मध्ये त्यांच्या कंपनीचे टर्नओव्हर 4000 कोटी रूपये होते.

मुकेश अंबानी
– देशातले सगळ्यात श्रीमंत व्यवसायीक आहेत मुकेश अंबानी. रिलायंस इंडस्ट्रीचे चेयरमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी देशातील सगळ्यात फेमस आणि पॉवरफुल व्यवसायीक कपल आहेत. या वर्षी रिलायंस जियोमुळे अंबानी कपल आणि त्यांची मुले ईशा, आकाश आणि अनंत खुप चर्चेत आले होते. मुकेश अंबानी पेट्रोलियम, टेलिकॉम, रिटेल आणि टेक्सटाइल व्यवसायात आहेत. त्यांचे नेटवर्थ सध्या 42 अब्ज डॉलर आहे.