ताज्या बातम्या

Mukesh Ambani’s RIL | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला ‘विक्रम’, यावर्षी गुंतवणुकदारांना दिला 37 % फायदा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mukesh Ambani’s RIL | आज रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industrie) च्या शेयर (Shares) मध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीचे शेयर विक्रमी स्तरावर पोहचले आहेत. पहिल्यांदा कंपनीचा शेयर 2700 रुपयांच्या स्तराच्या पुढे गेला आहे. तर रिलायन्स मार्केट कॅप (Reliance market cap) सुद्धा विक्रमी पातळीवर आले आहे. (Mukesh Ambani’s RIL)

 

बाजार बंद होईपर्यंत कंपनीच्या शेयरमध्ये हलकी घसरण पाहायला मिळाली. यावर्षी रिलायन्सच्या शेयरने गुंतवणुकदारांना सुमारे 37 टक्के रिटर्न म्हणजे प्रति शेयर 700 रुपयांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

 

आज विक्रमी स्तरावर पोहचला शेयर
आज व्यवहाराच्या सत्रादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा शेयर 2724.70 रुपये प्रति शेयरसह विक्रमी पातळीवर पोहचला. म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत कंपनीच्या शेयरने सुमारे 54 रुपयांच्या तेजीसह उसळी घेतली. (Mukesh Ambani’s RIL)

 

त्यानंतर कंपनीच्या शेयरमध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर 2645.05 रुपयांसह दिवसाच्या लोएस्ट लेव्हलवर सुद्धा गेला. व्यवहार बंद झाल्यानंतर कंपनीचा शेयर 2651.15 रुपयांवर बंद झाला.

 

यावर्षी 37 टक्के दिला रिटर्न
यावर्षी रिलायन्सच्या शेयरने 37 टक्के रिटर्न दिला आहे.
या वर्षाची सुरूवात झाल्यानंतर कंपनीचा शेयर 1987.15 रुपयांवर होता. ज्यामध्ये 37 टक्केच्या वाढीसह 737.55 रुपयांची तेजी दिसून आली आहे.

 

18 लाख कोटी रुपयांच्या पुढे मार्केट कॅप
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स पीपीचे शेयर आज जेव्हा उंचीवर पोहचले तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 18 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

 

आकड्यांनुसार जेव्हा रिलायन्सचा शेयर 2724.70 रुपयांवर पोहचला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1727308.06 रुपयांवर होते
आणि रिलायन्स पार्टली पेड शेयरची प्राईस 2084.10 रुपयांसह उच्च स्तरावर होता,
तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 87893.81 कोटी रुपयांवर गेले होते. हे दोन्ही एकत्रित केल्यास कंपनीचे एकुण मार्केट कॅप 1815201.87 कोटी रुपये झाले.

 

Web Title :- Mukesh Ambani’s RIL | mukesh ambani reliance industries reach record level investors made a profit of 37 percent this year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | पुन्हा कमी झाला सोन्याचा दर, चांदीही झाली ‘स्वस्त’; जाणून घ्या नवीन दर

Stealthing | ‘सेक्स’च्या दरम्यान गुपचुप कंडोम काढण्यावर ‘इथं’ बनवला कडक कायदा ! चर्चा सुरू, लोक म्हणाले – ‘कसे होणार सिद्ध?’

LIC Saral Pension योजनेत एकदाच गुंतवा पैसे आणि आयुष्यभर घरबसल्या घ्या पेन्शनचा लाभ; जाणून घ्या

Back to top button