अनंत अंबानीचा देखील साखरपुडा ?

वृत्तसंस्था :

प्रसिद्ध भारतीय व्यापारी मुकेश आंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला . आता अंबानी कुटुंबात पुन्हा लग्नाची शेहनाई वाजणार असे वृत्त आहे. ईशा अंबानी आणि आकाश आंबानी यांच्यानंतर मुकेश यांचे छोटे पुत्र अनंत अंबानी यांच्या साखरपुड्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

हॅलो मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि ईशा अंबानींप्रमाणेच अनंत देखील साखरपुडा करत असल्याचे वृत्त आहे. राधिका मर्चंट सोबत असलेला अनंत यांचा फोटो सोशल वर चांगलाच व्हायरल होतो आहे. अनंत च्या या छायाचित्रात अनंत अंबानी नेहरू जॅकेट मध्ये दिसत आहे तर राधिका मर्चंट काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. ईशा अंबानी या वर्षी डिसेंबरमध्ये विवाह करणार आहे.

 

संबंधित घडामोडी:

‘नवराई माझी लाडाची ‘वर थिरकल्या नीता अंबानी