मुकेश भट यांचा धक्कादायक ‘खुलासा’ ! म्हणाले – ‘मला आधीच त्याच्या आत्महत्येची चाहूल लागली होती’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या आत्महत्येबद्दल मुकेश भट यांनी आता एक नवीन खुलासा केला आहे. सुशांतच्या आत्महत्येबद्दल बोलताना मुकेश यांनी सांगितलं की, मला चाहूल लागली होती की, सुशांत असं काही करणार आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना मुकेश भट म्हणाले की, “आम्ही पहिल्यांदा आशिकी 2 सिनेमाच्या वेळी भेटलो होतो. काही कारणामुळं आम्ही त्याला कास्ट करू शकलो नाही. परंतु सडक 2 करताना आलिया आणि महेश यांनी मला त्याचं नाव सुचवल्यानंतर मी त्याला भेटायला बोलावलं होतं. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली.”

मुकेश भट पुढे म्हणालो, “आम्ही बराच वेळ बोललो. परंतु तो कुठेतरी हरवलेला होता. मला जणवलं होतं की, कशामुळंतरी तो गोंधळलेला आहे. त्याचं बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ही गोष्ट एक-दीड वर्षांपूर्वीची आहे. मला तर तो तेव्हाच खूप डिस्टर्ब वाटला होता. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. मला चाहूल लागली होती की, काहीतरी वेगळं आणि काहीतरी वाईट घडणार आहे.”

यावेळी मुकेश यांनी परवीन बाबीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “मी माझ्या करिअरची सुरुवात परवीन बाबी सोबत केली होती. तीही अशीच नैराश्येची शिकार झाली होती. मी सुशांतचं निरीक्षण केल्यानंतर भावाला म्हटलं होतं की, हा मुलगा परवीनच्या पावलावर तर पाऊल टाकत नाहीये ना. जेव्हा मला त्याच्या आत्महत्येबद्दल कळालं तेव्हा मला धक्काच बसला. कारण मला हे आधीच जाणवलं होतं.”