Mukesh Chhabra | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्याबद्दल मुकेश छाबरा यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले….

पोलीसनामा ऑनलाइन : Mukesh Chhabra | आज कलाक्षेत्रात कास्टिंग डायरेक्टर म्हणून मुकेश छाबरा (Mukesh Chhabra) यांचे नाव आवर्जून घेतले जाते. मुकेश हा हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये एक मोठा कास्टिंग डायरेक्टर (Mukesh Chhabra) म्हणून ओळखला जातो. चित्रपट बनवताना अनेक घटकातील कलाकार हे महत्त्वाच्या भूमिकेत असतात. मात्र पडद्यावर केवळ अभिनय करणारे कलाकाराच प्रेक्षकांना दिसतात. त्यामागे अनेक लोकांची मेहनत लागलेली असते. एक चित्रपट बनवताना त्यामागे कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत कॉस्ट्यूम या बरोबरच कास्टिंग या अशा महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच मध्ये कोणत्या भूमिकेसाठी कोणता कलाकार योग्य असेल हे ठरवण्यासाठी कास्टिंग केले जाते. हे काम कास्टिंग डायरेक्टरचे असते. नुकताच एका मुलाखतीत मुकेशने इंडस्ट्रीतील काही महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केले आहे.

मुकेश यांनी आजवर लहानात लहान कलालकारांपासून ते महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यापर्यंत कित्येकाचे कास्टिंग केले आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मुकेश यांनी त्यांचे कास्टिंग क्षेत्रातील अविस्मरणीय क्षण शेअर केले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूत बद्दल (Sushant Singh Rajput) देखील भाष्य केले. यावेळी त्यांनी सुशांतचे मन भरून कौतुक केले आहे.

यावेळी बोलताना मुकेश (Mukesh Chhabra) म्हणाले, “काय पो चे या चित्रपटादरम्यान माझी सुशांत बरोबर भेट झाली आणि त्यांनी तेव्हा मला सांगितलं की माझ्या पहिल्या चित्रपटात तो काम करेल आणि त्यांनी तसं केलं ही. कोणतीच कथा न ऐकता त्याने ‘दिल बेचारा’साठी डायरेक्ट होकार दिला. त्याच्या मृत्यूनंतर अशी चर्चा होती की तो मृत्यू आधी खूपच डिप्रेशन मध्ये होता. मात्र मला तसे वाटत नाही. त्याचा मूड ऑफ असायचा पण तो डिप्रेशन मध्ये आहे असे कधीच जाणवले नाही.

आजकाल आपल्या देशामध्ये नैराश्य आणि डिप्रेशन अशा मोठमोठ्या शब्दांना फार महत्त्व दिले जात आहे.
कोणाचा मूड खराब असला की लगेच लोक त्याला डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला देतात.
मात्र सुशांतचा मूड ठीक नसायचा याचा अर्थ तो डिप्रेशन (Depression) मध्ये आहे हे ठरवणं योग्य नाही.
सुशांतने आजवर ‘काय पो चे’. ‘एम एस धोनी’, ‘केदारनाथ’ यासारख्या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेतली.
हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तो त्या चित्रपटातील प्रत्येक पात्रासाठी जीव तोडून मेहनत करायचा
आणि त्याची काम करण्याची पद्धत ही इतर कलाकारांपेक्षा थोडीशी हटके होती”.
सुशांत बद्दल वक्तव्य करताना मुकेश जरा भावूक झाले. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला
मात्र त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title :-  Mukesh Chhabra | casting director mukesh chhabra speaks about sushant singh rajput depression and anxiety

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांना बांबुने मारहाण; वारजेमधील घटना, दोघे जखमी

Nashik Crime News | अज्ञात महिलेने घरात घुसून आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, नाशिकमधील घटना

Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या

The Dark Shadow Motion Pictures | समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धेचे आयोजन; विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, गायक उत्कर्ष शिंदे असे अनेक दिग्गज लावणार हजेरी