‘महाभारत’ मधील ‘भीष्म’ मुकेश खन्नांना पसंत नव्हतं रामानंद सागर यांचं ‘रामायण’, सांगितलं ‘कारण’

पोलीसनामा ऑनलाईन :लॉकडाऊनमध्ये सुरू असलेला रामानंद सागर यांचा रामायण हा शो आजही प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या शोनं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल दिग्गज अ‍ॅक्ट्रेस मुकेश खन्ना यांना काही वर्षांपूर्वी रामायण ही मालिका अजिबात आवडली नव्हती.

का मुकेश खन्नाला आवडली नव्हती रामायण ?

एका मुलाखतीत बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, “मला हे कबूल करायचं आहे की, मला टीव्ही शो रामायण कधीच नाही आवडला. हे म्हणजे असं होतं की, मी भाजपचा होतो आणि रामायण मालिका काँग्रेसची होती. मी रामायण पहायचो तेव्हा वाटायचं की, रामानंद सागर यांनी एवढं स्लो मोशन का बनवलं आहे. मला महाभारत पहायला आवडायचं कारण त्यात सारं काही वेगानं घडत होतं.”

पुढे बोलतान मुकेश म्हणाले, “मी आता रामायणचं रिटेलीकास्ट पहात आहे. ते पाहून मी आता चकित झालो. प्रत्येक सीननंतर रवींद्र जैनची चौपाई येते. हे पाहणं खूप सुखावह वाटत आहे. काही सीन्स पाहून तर माझे डोळे पाणावले. आता मला रामायण आवडायला लागली आहे. अरुण गोविलनं शानदाम केलं आहे. त्यांनी एक स्मित पकडलं जे शेवटपर्यंत नाही सोडलं. सीता, भरत, जनक, दशरथ पूर्ण कास्टचं काम शानदार आहे.”मुकेश खन्ना यांनी महाभारत मध्ये भीष्म पितामाह यांचा रोल साकारला होता.

You might also like