रेल्वे ट्रॅकवर मिळाला होता ‘रामायण’ मालिकेतील ‘विभीषण’ मुकेश रावल यांचा मृतदेह, मुलाच्या मृत्यूनं होते ‘अस्वस्थ’

पोलिसनामा ऑनलाइन –रामानंद सागर यांच्या रामायणमधील पात्रांना आजही त्याच पात्राच्या रूपात आठवलं जातं. काहींना तर लोक खरंच देव समजू लागले होते. राम, लक्ष्मण, विभीषण, रावण असे सर्वच रोल प्रेक्षकांना खूप भावले होते.

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत मुकेश रावल यांनी विभीषणचा रोला साकारला होता. मुकेश टीव्ही व सिनेमातील एक उत्तम कलाकार होते. ते खूप हसतमुख होते. परंतु त्यांचं आयुष्य असं होतं की ते खूपच परेशान होते.

मुकेश रावल यांचा मृत्यू एका रेल्वेच्या दुर्घटनेत झाला होता. त्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला होता. त्यांच्या मृत्यू नंतर अशाही चर्चा झालेल्या की त्यांनी आत्महत्या केली आहे. परंतु हे कोडं अद्याप तसंच आहे. जेव्हा मुकेश यांच्या कुटुंबियांना याबाबत विचारण्यात आला तेव्हा मात्र त्यांनी या गोष्टीचं खंडन केलं.

मुकेश रावल यांच्याबद्दल अनेक गोष्टी सोशलवरून समोर येताना दिसत आहेत. असं म्हटलं जातं की, मुकेश एक थिएटर आर्टीस्ट होते. रामायण हा त्यांचा पहिला प्रोग्राम होता. त्यांनी यासाठी मेघनाथ आणि विभीषण असं दोन्हीचं ऑडिशन दिलं होतं. परंतु नंतर त्यांना विभीषण म्हणून निवडण्यात आलं. यानंतर त्यांना फिल्म आणि टीव्हीसाठी अनेक ऑफर मिळू लागल्या. असं म्हटलं जातं की त्यांच्या मुलाचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला होता ज्यामुळं ते डिप्रेशनमध्ये होते आणि 2016 मध्ये त्यांनीही रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केली.