नागपूरचा ‘DSK’ कुख्यात बिल्डर मुकेश झामला पत्नीसह पुण्यात अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेला कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पूनम झाम या दोघांना नागपूर पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे.

पुण्यातील डीएसके यांच्या जामीन फेटाळल्यानंतर ते पत्नीसह फरार झाले होते. पुणे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दिल्लीत दोघांना अटक केली होती. तशाच पद्धतीने बिल्डर मुकेश झाम हा गेल्या काही दिवसांपासून नागपूरातून फरार झाला होता. तो पत्नीसह हिंजवडी येथे रहात असल्याचे समजल्यावर नागपूर पोलिसांचे एक पथक गेले काही दिवस पुण्यात आले होते. गुरुवारी हिंजवडी परिसरात तो एका फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला पत्नीसह ताब्यात घेतले. झाम याने नागपूरात गिळंकृत केलेली कोट्यवधीची माया पुण्यात गुंतविल्याचे समोर येत आहे. झाम पतीपत्नीबरोबर मोठी रोकडही पोलिसांच्या हाती लागली आहे.

मुकेश झाम आणि त्याच्या पत्नीवर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहे. हेमंत झाम, त्यांचा काका मुकेश झाम आणि नातेवाईकांनी कन्हैय्या सिटीच्या नावाखाली बंगलो, फ्लॅट स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांना गंडा घातला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या प्रकल्पात गुंतविली होती. शेकडो लोकांना फसवणूक त्यांनी पळ काढला होता. पोलिसांसह न्यायालयाच्या आदेशालाही ते दाद देत नव्हते. पोलिसांच्या लेखी फरार असलेला हेमंत झाम हा २ कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात सोनेगावात ऐशोरामात राहत होता.

हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी त्यांना तातडीने शोधून काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिसांनी हेमत झाम आणि त्याचा साथीदार यौवन गंभीर याला अटक केली. त्यांच्याकडे केलल्या चौकशीत पोलिसांना काही माहिती मिळाली होती. त्यानुसार मुकेश व त्याच्या पत्नीच्या शोधासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी विशेष पथक नेमले. गेल्या तीन दिवसांपासून हे पथक झाम कुटुंबाचा पुण्यात शोध घेत होते. अखेर ते हिंजवडी येथे असल्याचे समजल्यावर गुरुवारी त्यांना ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना नागपूरात आणण्यात येणार आहे.

Visit : policenama.com