Mukhbir Yojana | सरकारला आपल्या आजूबाजूची ‘ही’ माहिती दिली तर मिळतील 3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : Mukhbir Yojana | केंद्र सरकार आणि राज्य सरकार कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. राज्य सरकारांनी यावर नियंत्रणासाठी अनेक योजना सुद्धा सुरू केल्या आहेत. तुम्हीही सरकारच्या या उपक्रमात योगदान देऊ शकता आणि यासाठी सरकार तुम्हाला प्रोत्साहन (Mukhbir Yojana) रक्कम सुद्धा देईल. ही रक्कम सरकारने आता वाढवली आहे.

राजस्थान सरकारने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत भ्रूण लिंग तपासणीत सहभागी डॉक्टर आणि इतर लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी योजना सुरू केली होती. या योजनेत माहिती देणार्‍यासाठी प्रोत्साहनपर रक्कम अडीच लाखावरून आता तीन लाख केली आहे.

काय करावे लागते?

जन्मापूर्वी बाळाचे लिंग जाणून घेणे गुन्हा आहे. मात्र असे काम करणारे डॉक्टर आणि इतर लोकांची तुम्हाला माहिती असल्यास ती तुम्ही सरकारला देऊ शकता. जर तुमची माहिती खरी आढळली तर तुम्हाला तीन लाख रुपये दिले जातात.

अगोदर गरोदर महिलेला तीन हप्त्यात एकुण एक लाख रुपयांची रक्कम दिली जात होती, परंतु आता
दोन हप्त्यात एकुण दिड लाख रुपये प्रोत्साहनपर दिले जातील. सोबतच माहिती देणार्‍यास तीन
हप्त्यात 33 हजार 250 प्रति हप्ता, सहकार्‍याला 16 हजार 625 रुपये प्रति हप्ता मिळत होते. परंतु
आता, माहिती देणार्‍यास दोन हप्त्यात 50-50 हजार रुपये आणि सहकार्‍याला 25-25 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम दिली जाईल.

कुठे करू शकता तक्रार?

जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही तक्रार टोल फ्री नंबर 104/108 आणि व्हॉट्सअप नंबर 9799997795 वर तक्रार करू शकता.

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेवर येईल – फडणवीस

Samruddhi Mahamarg Accident | दुर्देवी ! समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mukhbir Yojana | rajasthan government increased reward money in pspndt mukhbir yojana check here all details how can you get it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update