१०० ‘निवडक’ भाषणांचा संग्रह म्हणजे प्रा.विशाल गरड लिखित ‘मुलुखगिरी’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पांगरी ता.बार्शी येथील वक्ते तथा लेखक प्रा.विशाल गरड यांच्या बहुचर्चीत ‘मुलुखगिरी’ या पुस्तकाचे प्रकाशन राकेश मंडलिक यांच्या हस्ते पांगरी येथे संपन्न झाले. मुलुखगिरी हे पुस्तक प्रा.गरड यांनी आजवर दिलेल्या व्याख्यानांच्या अनुभवांच्या रोजनिशीचा संग्रह आहे. नवोदित युवकांना प्रबोधन क्षेत्रात येण्यास प्रवृत्त करणारे हे पुस्तक असुन साहित्य क्षेत्रात हे पुस्तक एक वेगळा ठसा उमटवेल असे प्रतिपादन लेखक विशाल गरड यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

प्राध्यापक विशाल गरड यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त विषयांवर भाषणे दिली आहेत. या भाषणांपैकी १०० निवडक भाषणांचा संग्रह म्हणजे मुलुखगिरी हे पुस्तक होय. पुस्तकाचे लेखक प्रा.विशाल गरड यांची रिंदगुड व हृदयांकित हि पुस्तक प्रकाशित आहेत.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ३०० पुस्तके वाचलेल्या भाग्यश्री शिंदे यांचा आणि सिनेमॅटोग्राफर अमोल लोहार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी खंडू डोईफोडे, प्रमोद भोंग, विश्व लिमये, ऋषिकेश जाधव, शुभम मिसाळ, ऋषिकेश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून प्रा.गरड यांना शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तात्या बोधे होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रा.गरड यांचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून स.पो.नि सचिन हुंदळेकर, सरपंच इन्नूसभाई बागवान, अ‍ॅड.अनिल पाटील, नवनाथ कसपटे, प्रा.विलास जगदाळे, मा.उपसभापती विजय गरड, मोहनबापू घावटे यांसह आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गोडसे यांनी केले तर सुत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम तरूण मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.

आरोग्य विषयक वृत्त – 

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार

मोदींनी केला ‘शशांकासन’ चा व्हीडिओ शेयर

You might also like