Mukhya Mantri Kisan Yojana | PM Kisan योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार; एकनाथ शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mukhya Mantri Kisan Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’च्या (Pantpradhan Kisan Samman Nidhi Yojana) धर्तीवर आता राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ (Mukhya Mantri Kisan Yojana) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागासोबतच्या (Agriculture Department) बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात (Budget) यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. या नुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

कृषी विभागाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झालेला असला तरी अर्थसंकल्पात योजनेसाठी नेमकी किती रुपयांची तरतूद केली जाणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मात्र, सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याचे निकषही अद्याप समोर आलेले नाहीत.
परंतु मागील तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

आगामी महानगरपालिका (Municipal Corporation Election), तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी राज्य सरकारचा (State Govt) प्रयत्न
असण्याची शक्यता आहे.

Web Title :-  Mukhya Mantri Kisan Yojana | agriculture news mukhya mantri kisan yojana will be implemented in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन ; फुलांची उधळण, कोल्ड फायरची विद्युत अतिशबाजी आणि ढोल ताशाचा दणदणाट

Rain in Maharashtra | संपूर्ण राज्यात पावसाचा ‘येलो’ अलर्ट, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

Itchy & Dry Skin | त्वचा नेहमी कोरडी राहते का? ‘हा’ आजार असू शकतो कारणीभूत