मुक्‍ता दाभोळकर, जितेंद्र आव्‍हाड होते निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नालासोपार स्फोटक प्रकरणात आज एटीएसने मुंबई सत्र न्यायालयात खळबळजनक माहिती उघड केली आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींच्या रडारवर आणखी चार लोकांची नाव असल्याची माहिती एटीएसनं न्यायालयासमोर दिली आहे. यात मुक्ता दाभोळकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आणि रितूराज ही मंडळी नालासोपारा आरोपींच्या टार्गेटवर असल्याचा दावा एटीएसने केला आहे. या प्रकरणातील आरोपी अविनाश पवार याला आज (शुक्रवारी) सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b71e1580-acff-11e8-9a55-2f1fd6f35f1e’]

एटीएसने यावेळी आतापर्यंत अविनाशकड़े केलेल्या तपासाची डायरी न्यायालयासमोर उलगडली, यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसने न्यायालयाकडे अविनाशच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.

दरम्यान, नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध असल्याने एटीएसच्या कोठडीत असलेल्या शरद कळसकर याची आणि सीबीआय कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याची समोरसमोर चौकशीसाठी सीबीआय प्रयत्न करतेय. सीबीआयनं मुंबईतील सेशन्स कोर्टाकडे यासाठी परवानगी मागितली आहे. काल पुणे सीबीआय कोर्टाने अंदुरेची पोलीस कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. तर मुंबई सेशन्स कोर्टाने शरद कळसकरची पोलीस कोठडी ३ सप्टेंबरपर्यंत वाढवली. पण डॉक्टर दाभोलकर हत्याप्रकरणी त्याचा ताबा सीबीआयला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कळसकरला पुण्याला नेणं शक्य नसल्यानं आता अंदुरेला मुंबईत आणून कळसकरसोबत समोरासमोर चौकशी करण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ही परवानगी सीबीआयकडून कार्टाकडे मागण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc392697-acff-11e8-90cf-a1b10332419e’]

दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक असलेल्या अमोल काळेचा उल्लेख पहिल्या रिमांड पासून एटीएसने केला आहे. मग अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केले, असा सवाल करत न्यायालयाने एटीएसला फटकारले आहे. तसेच अविनाशच्या तपासाबाबत योग्य उत्तर देण्यास एटीएसला २ तासांचा वेळ दिला.

अतिशय महत्वाचे 

सचिन अंदुरेला सोबत घेवुन सीबीआय पथकाकडून ‘त्या’ परिसराची पहाणी
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन प्रकाशराव अंदुरेला घेवुन केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पथक पुण्यात दाखल झाले असुन सीबीआयच्या पथकाने अंदुरेला सोबत घेवुन ओंकारेश्‍वर मंदिराजवळील त्या परिसराची  पाहणी केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्री सीबीआयचे पथक पुण्यात दाखल झाले आहे.

सचिन अंदुरेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळया घातल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे. दि. 20 ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळ गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.

 

 

संबधित बातम्या

नालासोपारा स्फोटके प्रकरणाची व्याप्ती राज्यभर; पुण्यातील दोघांसह 12 जण ताब्यात
नालासोपारा स्फोटकं प्रकरण, आरोपींकडून सनबर्नमध्ये घातपाताचा कट
नालासोपारा स्फोटकप्रकरणात घाटकोपरमधून आणखी एक अटकेत
नालासोपारा स्फोटक प्रकरण: आरोपी श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या अगोदरच्या आरोपत्रामुळे नवा वाद