Mukta Tilak Funeral | आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mukta Tilak Funeral | कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी (Vaikunth Smashanbhumi) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Cremated with State Pomp) करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. (Mukta Tilak Funeral)

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh), पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल (DCP Sandeep Singh Gill), माजी मंत्री रमेश बागवे (Ramesh Bagwe), बाळा भेगडे (Bala Bhegde), विजय शिवतारे (Vijay Shivtare), माजी आमदार जगदीश मुळीक (MLA Jagdish Mulik), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol), उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते. (Mukta Tilak Funeral)

Mukta Tilak Funeral | MLA Mukta Tilak was cremated with state pomp
file photo

 

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार मुक्ता टिळक यांनी सुरुवातीच्या काळात नगरसेवक म्हणून काम केले. नगरसेवक असतांना सभागृह नेता, स्थायी समितीवरही काम केले. पुणे महानगर पालिकेत 2017 मध्ये त्यांनी पुणे शहराच्या महापौर पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. लोकमान्य टिळकांचा विचार त्या स्वतः जगत होत्या. सामाजिक कार्यात योगदान देताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी संघर्षही केला. संघटनेचा आदेश कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका कशी पार पाडावी हे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवेळी मुक्ताताईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. टिळक कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, असे ते म्हणाले.

आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

Web Title :-Mukta Tilak Funeral | MLA Mukta Tilak was cremated with state pomp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | …त्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत – रोहित पवार

Ravi Rana | उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शंभूराज देसाईंनी दिले चौकशीचे आदेश

Aditi Tatkare | सभागृहात सत्ताधारी पक्षाचे लोकच कामकाजात खोडा घालत आहेत – अदिती तटकरे