Mukund Nagar Pune Fire | मुकुंदनगर: केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mukund Nagar Pune Fire | आज सकाळी 10.15 वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुकुंदनगर, महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वॉटर टँकर तसेच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथील एक अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

दलाची मदत पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर घटनास्थळी केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागली आहे व धूर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचवेळी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग सुमारे १५ मिनिटात पुर्ण विझवली. तसेच तिथे खेळासाठी आलेले खेळाडू व शिक्षक यांच्याशी संवाद साधत सर्वजण सुरक्षित असल्याची खाञी केली. याचवेळी उपस्थित खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांची कर्तव्य तत्परता व कामकाज पाहून त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे आभार मानले. या आगीमध्ये खेळासाठी असणारे साहित्य जसे की, गाद्या, फोम, इलेक्ट्रिक वायर, संगणक, सीसीटीवी व कार्यालयातील इतर वस्तुंचे ही नुकसान झाले. तिथेच असणारे जिमनास्टिकचे साहित्य ही जळाले होते. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून या घटनेत कोणी ही जखमी नाही.

या कामगिरीत अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड,
स्टेशन ड्युटी ऑफिसर सुनिल नाईकनवरे व वाहनचालक हनुमंत कोळी, शुभम करांडे,
निलेश कदम तसेच जवान विनायक माळी, जितेंद्र कुंभार, अतुल खोपडे, आशिष लहाने, दत्तात्रय वाबळे, गणेश मोरे, हेमंत शिंदे,
सुरेश सुर्यवंशी, आदित्य परदेशी, अनिकेत खेडेकर, साईनाथ पवार, महेश घटमळ यांनी सहभाग घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी