Mula Mutha River Rejuvenation Project | नदी काठ सुधार योजना : विदेशी प्रजातीचे वृक्ष काढण्याची परवानगी मिळण्यापुर्वीच महापालिकेने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्थानीक प्रजातीचे वृक्ष लावण्यास सुरूवात केली
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बंडगार्डन येथे वृक्षारोपण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mula Mutha River Rejuvenation Project | पर्यावरण दिनाचे (Environment Day) औचित्य साधून पुणे महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) मुळा-मुठा नदी काठ सुधार प्रकल्पाअंतर्गत काम सुरू असलेल्या बंडगार्डन येथील गणेश घाट ते सादलबाबा दर्गा (Ganesh Ghat at Bundgarden to Sadalbaba Dargah) दरम्यान आज वृक्षारोपण करण्यात आले (Tree Plantation By Pune PMC). नदी काठ सुधार प्रकल्पाअंतर्गत विदेशी प्रजातींची झाडे काढून त्या ठिकाणी देशी झाडे लावण्यात येण्याची घोषणा महापालिकेने केली असून विदेशी प्रजातीची झाडे काढण्यापुर्वीच देशी प्रजातीची झाडे लावण्यास सुरूवात करून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. (Mula Mutha River Rejuvenation Project)
अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane), प्रकल्प अधिक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintending Engineer Yuvraj Deshmukh), उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे (Park Superintendent Ashok Ghorpade) यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदी काठ सुधारणा प्रकल्पाअंतर्गत येरवडा (Yerwada) येथील शादलबाब दर्गा ते गणेश घाट दरम्यानच्या स्ट्रेच ९ मधील सुमारे ३०० मीटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्प आराखड्यानुसार याठिकाणी स्थानीक प्रजातींचे वृक्ष लावण्यात येणार आहेत. याची सुरूवात प्रत्यक्षात जानेवारीमध्येच करण्यात आली असून आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने १० ते १५ फूट उंचीच्या झाडांचे रोपन करण्यात आले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. (Mula Mutha River Rejuvenation Project)
नदी काठ सुधार योजनेअंतर्गत शहरातून वाहाणार्या मुळा- मुठा नदीचा सुमारे ४४ कि.मी.च्या किनार्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ११ टप्प्यांमध्ये करण्यात येणार्या या प्रकल्पाच्या दोन टप्प्यांचे काम मागीलवर्षी सुरू करण्यात आले आहे. यापैकी टप्पा क्रमांक ९ आणि ११ मधील सुभाबूळ, कुभाबूळ, काटेरीबाभूळ, विलायची चिंच या विदेशी प्रजातीतील १ हजार ७८७ झाडे काढावी लागणार आहेत. ही झाडे काढण्याला पर्यावरण प्रेमींसह विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला असून यासंदर्भातील वाद एनजीटी पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, विदेशी वृक्षांमुळे पक्षी, प्राण्यांच्या अधीवासाला कुठलाही उपयोग होत नाही. याउलट नुकसानच होते. या पार्श्वभूमीवर ही झाडे काढून त्याठिकाणी करंज, मेढसिंगी, कांचन, कदंब, साग, मुचकुंद, रक्तरोहिडा, पिंपळ, कैलासपती, आंबा, जांभूळ, भोकर, खिरणी, घोळ, अर्जुन, लिंब, वड अशी प्राणी, पशु जीवनासाठी उपयुक्त ठरणारी देशी प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत. संपुर्ण प्रकल्पामध्ये ६९ हजार नवी झाडे लावण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार महापालिकेने विदेशी वृक्ष छाटण्याची परवानगी मिळण्याअगोदरच आराखड्यानुसार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड सुरू केली आहे.
Web Title : Mula Mutha River Rejuvenation Project | Even before getting permission to remove exotic trees,
the Municipal Corporation started planting trees of local species on the occasion of Environment Day.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा