Mula Mutha Riverfront Development | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यातील कामाची 360 कोटीची निविदा प्रसिद्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mula Mutha Riverfront Development | महापालिकेच्या सर्वसाधारण (Pune Corporation General Body Meeting) सभेने दोनच दिवसांपूर्वी नदी काठ सुधार योजनेच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील संगम घाट ते बंडगार्डन पूल (Sangam Ghat To Bundgardan Bridge) या टप्प्यातील कामची सुमारे 360 कोटी रुपये खर्चाच्या कामाची निविदा मागविण्यात (Mula Mutha Riverfront Development) आली आहे. या टप्य्यात नदीच्या दोन्ही तीरावर पिचिंग करण्यात येणार आहे. तसेच संगमघाट येथे सुशोभीकरण, संगमवाडीच्या बाजूने सायकल ट्रॅक, नाईक बेटाचे सुशोभीकरण करण्यात असून भविष्यात नदीपात्रात बोटिंगचेही नियोजन करण्यात येणार आहे.

 

 

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा – मुठा नदीच्या (Mula Mutha Riverfront Development) दोन्ही तीरावर जवळपास 44 की. मी. परिसरातील नदीकाठ सुधार करण्यात येणार आहे. नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करणे, पुराचा धोका कमी करणे, नदीच्या बाजूने सार्वजनिक जागा निर्माण करणे, नदीच्या पाण्याची पातळी टिकवून ठेवणे, नागरिकांना नदीपर्यंत पोहोचता यावे यासाठी सुविधा निर्माण करणे,  नदीलगत अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक वास्तू, मैदाने, उद्याने आणि नदीकाठ संवर्धन करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 11  टप्प्यांमध्ये करण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 4 हजार 765 कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी पहिले तीन टप्पे प्रायोगिक तत्वावर करण्यास त्यातही तीन पैकी एका टप्प्याचा 700 कोटी रुपयांचा खर्च महापालिकेच्या माध्यमातून तर दोन टप्पे पीपीपी तत्वावर करण्यास दोनच दिवसांपूर्वी सर्वसाधरण सभेत एकमताने मान्यता देण्यात आली आहे.

 

Pune Forest caught leopard | तब्बल 17 तासानंतर पुण्याच्या हडपसर परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद (व्हिडीओ)

आज यापैकी महापालिकेच्या (Pune Corporation) खर्चातून करण्यात येणाऱ्या संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच 9) च्या कामाची 305 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. जीएसटीसह (GST) सुमारे 360 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून अडीच वर्ष कामाची मुदत आहे.

 

या टप्प्यात इंजिनिअरिंग कॉलेज पासून बंडगार्डन येथिल बंड दरम्यान संगमवाडीच्या तीरावर पिचिंग करण्यात येणार आहे.
तसेच पिचिंग केलेल्या मध्यभागातून सायकल ट्रॅक करण्यात येणार आहे.
हा ट्रॅक थेट बंडगार्डन येथील पुलापर्यंत असेल. पिचिंग केलेल्या भागावर उष्णता वाढू नये यासाठी हिरवळ व शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत.

संगमघाटा वरील पुरातन वास्तूला कुठलाही धक्का न लावता या परिसराचे अनुरूप संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
नाईक बेटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
ताडीवाला रोड लगत नदी काठावर संरक्षक भिंतही वेलींनी सुशोभित करण्यात येणार आहेत.
नदीपात्रात ठिकठिकाणी नागरिकांना उतरण्यासाठी जागा, तसेच बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच संपूर्ण परिसरात एक हजार देशी प्रजातीचे वृक्षही लावण्यात येणार आहेत.
पिचिंग केल्याने बंडगार्डन ते संगमघाट परिसरापर्यंत (Mula Mutha Riverfront Development) नदीची पातळी पाच ते सहा फूट खोल राहणार आहे.
याठिकाणी बोटिंगची ही व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) यांनी दिली.

 

जायका कंपनीच्या (JICA Company) सहकार्याने नदीसुधार योजनेअंतर्गत शहरात निर्माण होणारे सर्व मैलापाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही योजना कार्यन्वित झाल्यानंतर निश्चितच नदीचे रूप पालटेल असा विश्वास युवराज देशमुख यांनी व्यक्त केला.

 

हे देखील वाचा

Robbery On Konark Express | कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा ! चोरट्यांनी सिग्नल कट करुन 2 महिलांचे दागिने लुटले, हल्ल्यात तरुण जखमी

WhatsApp Payment साठी ‘हे’ काम करणे आवश्यक; होणार मोठा बदल, जाणून घ्या

Pradhan Mantri Jan Arogya Yojana | 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडणार, कॅन्सर-डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर होणार उपचार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mula Mutha Riverfront Development | Mula Mutha river bank improvement plan! 360 crore tender for the first phase of work from Sangamwadi to Bundgarden

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update