Mula Mutha Riverfront Development | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडर्गान पुला दरम्यानच्या कामाची निविदा उघडली; जाणून घ्या

13.14 % कमी दराने आली निविदा, 340 कोटी रुपयांचा खर्च 300 कोटी रुपयांपर्यंत कमी होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळा – मुठा नदीकाठ सुधार योजनेतील (Mula Mutha Riverfront Development) महापालिकेच्या (Pune Corporation) अंदाजपत्रकीय तरतूदीतून (Budgetary Provisions) होणार्‍या संगमवाडी ते बंडगार्डन पुला (Sangamwadi to Bundgarden Bridge) दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील (फेज क्र.९) ची निविदा (Tender) आज उघडली. यामध्ये सहभागी झालेल्या पाच कंपन्यांपैकी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. (B G Shirke Construction Technology Pvt Ltd) कंपनीची १३. १४ टक्के कमी दराने आलेली निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी महापालिकेने ३०५ कोटी रुपयांचे एस्टीमेट केले होते. ही निविदा मान्य होउन लवकरच बहुप्रतिक्षीत नदी सुधार योजनेचा शुभारंभ होणार आहे. (Mula Mutha Riverfront Development)

 

पुणे महापालिकेने मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत (Mula Mutha Riverfront Development) पुणे महापालिकेच्या हद्दीतून वाहणार्‍या ४४ कि.मी. नदीच्या दोन्ही काठांचे सुशोभीकरण आणि अन्य नागरी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. ११ टप्प्यांमध्ये (फेजेस) राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम २०१६ पासून सुरू करण्यात आले आहे. दोन वर्षांपुर्वी या कामाच्या ४ हजार ७०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये संगमवाडी ते बंडगार्डन पुला दरम्यानच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. दोन वेळा तिला मुदतवाढही देण्यात आली होती. आज अखेर ही निविदा उघडण्यात आली आहे. ३०५ कोटी रुपयांचे एस्टीमेट आणि जीएसटीसह या कामासाठी ३४० कोटी रुपये खर्च होणार होते. परंतू कमी दराने निविदा आल्याने जीएसटीसह हा खर्च ३०० कोटी रुपयांपर्यंत कमी होणार आहे. (Mula Mutha Riverfront Development)

निविदा प्रक्रियेमध्ये बी. जे. शिर्के कंपनीसह मे. जे. कुमार इन्फ्रापोजेक्टस लि. (j kumar infraprojects ltd), न्याती इंजिनिअरींग ऍन्ड कन्स्लटंट प्रा. लि. (nyati engineers & consultants pvt ltd), मॉन्टेकार्लो लि. (Montecarlo Limited) आणि एनसीसी लि. (NCC Limited) या कंपन्याही सहभागी झाल्या होत्या. बी. जे. शिर्के कंपनी वगळता अन्य चारही कंपन्यांनी इस्टीमेटच्या रकमेपेक्षा पॉईंट ९९ ते १२ टक्के अधिकचे दर भरले आहेत. तर शिर्के कंपनीने इस्टीमेटपेक्षा १३. १४ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. या निविदेला अंतिम स्थायी समितीची मान्यता घेतल्यानंतर लवकरच तांत्रिक प्रक्रिया पार पाडून पहिल्या टप्प्यातील कामाचा श्रीगणेशा करण्यात येईल, अशी माहिती या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintendent Engineer Yuvraj Deshmukh) यांनी सांगितले.

नदी सुधार व नदी काठ सुधार योजनेबाबत व्यापक जनजागृती करणार – प्रशांत वाघमारे
नदी सुधार व नदी काठ सुधार योजनेच्या (Mula Mutha River Beautification Project) माध्यमातून शहराची जीवनवाहीनी मुळा – मुठा नदीचे पुनरुज्जीवन (Mula Mutha River Rejuvenation Project) करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेले हे काम दीर्घकाळ चालणार आहे. परंतू नागरिकांच्या सहकार्याने हे काम वेळेत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यासाठी या दोन्ही योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, नागरीकांच्या शंकाचे समाधान आणि सूचनांचा समावेश करून सर्व पुणेकरांनी एकत्र येउन हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी येत्या काळात जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येतील.

प्रशांत वाघमारे, शहर अभियंता
( Prashant Waghmare, City Engineer)

 

Web Title :- Mula Mutha Riverfront Development | Mula Mutha Riverfront Development Tender opened for work between Sangamwadi to Bandargan Bridge Find out

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा