Mulayam Singh Yadav | मुलायम सिंह यादव ICU मध्ये दाखल, प्रकृती खालावली, अखिलेश यादव दिल्लीला रवाना

नवी दिल्ली : प्रकृती खालावल्याने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातील (Medanta Hospital) आयसीयूत हलविण्यात आले आहे. येथील डॉ. नरेश त्रेहान (Dr. Naresh Trehan) आणि डॉ. सुशीला कटारिया (Dr. Sushila Kataria) त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, वडील मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या तब्येतीची माहिती मिळताच सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) लखनौहून दिल्लीला रवाना झाले.

 

अनेक दिवसांपासून मुलायम सिंह यादव गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. शिवपाल सिंह यादव (Shivpal Singh Yadav) हे देखील दिल्लीत आहेत.

 

82 वर्षीय मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गेल्या अनेक वर्षांपासून ठीक नाही.
त्यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे. रविवारी दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने,
आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला आहे.

मुलायम सिंह यादव यांना जूनमध्ये मेदांतामध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या पत्नीचे जुलैमध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांची प्रकृती सतत खालावत गेली.
मागील काही दिवसांपासून मुलायमसिंह यादव मेदांता हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल आहेत.

 

Web Title :- Mulayam Singh Yadav | mulayam singh yadavs health deteriorated akhilesh yadav left for delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा