Mulayam Singh Yadav Passed Away | समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गुरुग्राम : वृत्तसंस्था – Mulayam Singh Yadav Passed Away | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Uttar Pradesh Former Chief Minister) आणि समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये (Medanta Hospital) मागील काही दिवसांपासून मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरु होते. महिन्यातून 2-3 वेळा ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे. मात्र ऑगस्ट महिन्यापासून मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav Passed Away) यांची तब्येत खालावत चालली होती.

 

मुलायम सिंह यादव हे 22 ऑगस्टपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 2 ऑक्टोबरला दुपारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाव कमी झाला होता. त्यांना श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास होता. डॉ. नरेश त्रेहान (Dr. Naresh Trehan) आणि डॉ. सुशीला कटारिया (Dr. Sushila Kataria) त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या होती.

मुलायम यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1939 साली उत्तर प्रदेशातील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
तसेच 1996 ते 1998 दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये (Central Government) संरक्षणमंत्री (Defense Minister) होते.
1992 साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.
5 डिसेंबर 1989 रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.
1992 साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजे 5 डिसेंबर 1993 रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

 

 

 

Web Title :- Mulayam Singh Yadav Passed Away | mulayam singh passed away
samajwadi leader mulayam singh yadav passed away he breathed his last at the age of 82

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | महिलेकडून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची तरूणाला धमकी, धनकवडी परिसरात युवकाची आत्महत्या

Uddhav Thackeray | शिंदे गटाचा वापर केल्यानंतर भाजपा त्यांना लांब फेकणार, हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिले ‘या’ अभिनेत्याच्या जाहिरातीचे उदाहरण

Uddhav Thackeray | ‘काही जणांना वाटतं मीच एकटा सगळं करत आलो, नाही ओ अनेकांनी…’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर नाव न घेता प्रहार