Mulethi Face Pack | सैल त्वचेत येईल घट्टपणा, केवळ एकदाच लावा मुलेठीने बनवलेला ‘हा’ फेसपॅक; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mulethi Face Pack | सुरकुत्या, डाग, डार्क सर्कल्ससारख्या समस्या अगोदर केवळ वाढत्या वयात दिसत होत्या, परंतु आता या समस्या मुलींमध्ये अवेळी सुद्धा पहायला मिळतात. यावर महिला महागडे प्रॉडक्ट वापरतात पण काहीही उपयोगी होत नाही. या समस्येवर मुलेठी फेस पॅक (Mulethi Face Pack) अतिशय परिणामकारक आहे. यामुळे सैल पडलेली त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्यांच्या समस्येपासून दिलासा मिळतो.

मुलेठी फेसपॅक

साहित्य –

मुलेठी पावडर- 2 चमचे

मध – 1 चमचा

गुलाबजल

बनवण्याची आणि लावण्याची पद्धत
या फेसपॅकसाठी तिनही वस्तू चांगल्याप्रकारे मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहर्‍यावर 15-20 मिनिटापर्यंत लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका. आठवड्यात 1 वेळा हा फेसपॅक वापरा.

मुलेठी फेसपॅक लावण्याचे फायदे
मुलेठीमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, अँटी- ऑक्सीडेंट गुण भरपूर आढळतात. हे त्वचेला खोलवर पोषण देण्यासह ती स्वच्छ करते. त्वचेवरील घाण खोलवर स्वच्छ झाल्यानेेे चेहर्‍यावर नैसर्गिक ग्लो येतो. हा फेसपॅक स्किन पोर्स स्वच्छ करण्यासह सनटॅनने खराब झालेली त्वचा सुद्धा ठिक करतो. तसेच मुलेठी पॅक लावल्याने पिंपल्स, डाग, सुरकुत्या दूर होतात आणि त्वचा तरूण दिसते.

Web Title :- mulethi face pack for skin tightening

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)