Mulshi Dam | ‘ताम्हिणी’त सलग दुसर्‍या दिवशी अतिवृष्टी ! 24 तासात 514 मिमी पावसाची नोंद,  मुळशी धरणात ऐतिहासिक 80 दलघमी (2.83 TMC) पाण्याची आवक,  उजनी धरण प्लसमध्ये

पुणे : मुळशी धरण (Mulshi Dam) पाणलोट क्षेत्रातील सलग दुसर्‍या दिवशी अतिवृष्टी झाली असून ताम्हिणी येथे गेल्या २४ तासात ५१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुळशी धरणात (Mulshi Dam) गेल्या २४ तासात ऐतिहासिक अशा ८० दलघमी (२.८३ टीएमसी) आवक झाली आहे. धरणातील जलाशय पातळीत ७ फुटाने वाढ झाली आहे. मुळशी धरणात आज ५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रत्यक्ष मुळशी धरणावर ३३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पवना धरण (Pawana dam) परिसरात गेल्या २४ तासात २२८ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण ६६ टक्के भरले आहे. कळमोडी धरण (Kalmodi Dam) परिसरात ४२ मिमी पाऊस (Rain) पडला असून धरण १०० टक्के भरले आहे. धरणातून नदीत २ हजार ८१९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

Mulshi Dam | Heavy rains for the second day in a row in Tamhini 514 mm rainfall recorded in 24 hours

वडिवळे धरण (Vadivale Dam) परिसरात २१४ मिमी पाऊस झाला असून धरण ९४ टक्के भरले आहे. धरणातून ६ हजार २९४ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. भामा आसखेड धरण (Bhama Askhed Dam) परिसरात २४ मिमी पाऊस झाला असून धरण ६२ टक्के भरले आहे. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून भिमाशंकर परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

उजनी धरण प्लसमध्ये
सोलापूर सह मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारे उजनी धरण
(Ujani dam) प्लसमध्ये आले आहे. पुणे जिल्ह्यातील नद्यांवरील धरणाच्या पुढील भागात
पडलेल्या पावसाचे सर्व पाणी उजनी धरणात येऊन मिळते. प्रत्यक्ष उजनी धरण परिसरात पाऊस
झाला नसला तरी धरणात या नद्यांमधील पाणी पोहचल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठा अधिक झाला आहे.

२२ जुलै रोजी सकाळी धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे १.३० टक्के होता. धरणातील उपयुक्त
पाणी साठा उणे १९.३५ दलघमी (उणे ०.६९ टीएमसी) इतका होता. गेल्या २४ तासात धरणात
४६़५१ दलघमी (१.६० टीएमसी) इतका पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे उणे असलेल्या उजनी
धरणात आता १.७० टक्के इतका उपयुक्त पाणी साठा झाला आहे.

खडकवासला धरणासह (Khadakwasla Dam) अनेक धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
तसेच धरणाच्या पुढच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात
उजनी धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | रायगडमधील 7 एक्कर जमीन व पिंपळे गुरव येथील जागा जबरदस्तीने बाळकवण्यासाठी डोक्याला पिस्तुल लावून हवेत गोळीबार; ‘उद्योजक’ कुटुंबावर FIR

Pune-Bangalore Highway | निपाणीजवळील यमगर्णी पुलावर पुराचे पाणी आल्याने पुणे -बंगलोर महामार्ग बंद ! पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रस्ते दरडी, पूरामुळे बंद, बाहेर जाण्यापूर्वी करुन घ्या माहिती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mulshi Dam | Heavy rains for the second day in a row in Tamhini 514 mm rainfall recorded in 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update