सातारा रस्त्यावर अल्पवयीन कोयता गॅंगचा मुळशी पॅटर्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जनता वसाहत परिसरात टोळीयुद्धातून मागील पंधरवड्यातच सराईताचा खून झाल्याची घटना ताजी असताना एकमेकांकडे पाहत खुन्नस दिल्याच्या कारणावरून तरुणाला मारण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन त्याचा पाठलाग करत राडा घातल्याचा प्रकार सातारा रस्त्यावर घडला. सुदैवाने तरुण एका दुकानात घुसल्याने त्याचे प्राण वाचले.

पुण्यात मागील काही दिवसात कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांसह तरुणांना पाहून शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. अशी अवस्था निर्माण झाली आहे.

विशाल भोसले (२४, पर्वती) या तरुणाने यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी पाच अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. एकूण नऊ जणांविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर मध्ये अमर गायकवाड याचे हल्ला करणाऱ्या विकास कांबळे याच्यासोबत एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाले होते. त्यानंतर तो वाद आपापसात मिटवला होता. मात्र सोमवारी रात्री अमर गायकवाड व त्याचा मित्र जनता वसाहत परिसरात असताना आठ ते नऊ जणांनी  जणांनी हातात कोयते घेऊन त्याला मारण्यासाठी आले. त्यांना पाहून तो पळून गेला. त्यानंतर एकाने विशाल भोसले याच्या दिशेने कोयता भिरकावला. तर महेंद्र नवले व  अक्षय कुरघोनकर हे दोघेही सातारा रस्ता येथे असल्याची माहिती मिळाल्यावर हल्लेखोर दुचाक्य़ांवर कोयते घेऊन तेथे गेले. त्यावेळी त्यांनी दोघांना कोयत्याने मारहाण केली मात्र ते एका मेडीकल स्टोअरमध्ये घुसल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र हल्लेखोरांनी तेथेही तोडफोड करत मोठा राडा घालत तोडफोड केली. दत्तवाडी पोलिसांनी  याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. साधारण अर्धा तास हा थरार रस्त्यांवर सुरु होता.